ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दिवाळीनिमित्त बँकांना सलग 4 दिवस सुट्ट्या

वाचा संपूर्ण यादी

google.com, pub-1602819151212103, DIRECT, f08c47fec0942fa0

नवी दिल्ली, वृत्तसंस्था 

दिवाळीनिमित्त बँकांना सलग 4 दिवस सुट्ट्या देण्यात आल्या आहेत.  वसुबारसपासून दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. 29 ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे. धनत्रयोदशीपासून दिपोत्सव सुरू होतो. त्यामुळे बँकांच्या दिवाळी सुट्ट्या 31 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. परंतु वेगवेगळ्या राज्यात सुट्ट्यांची तारीख वेगळी आहे. रिझर्व्ह बँकेकडून या सुट्ट्या जारी केल्या जातात. 

 

31 ऑक्टोबर

आसाम, आंध्र प्रदेश, दिल्ली, गोवा, गुजरात, कर्नाटक, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील बँका दिवाळीनिमित्त, काली पूजेसाठी, सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि नरक चतुर्दशीनिमित्ताने 23 ऑक्टोबर रोजी बंद राहणार आहेत.

 

1 नोव्हेंबर 

महाराष्ट्र, कर्नाटक, जम्मू आणि काश्मीर, मणिपूर, मेघालय, सिक्कीम, त्रिपुरा आणि उत्तराखंडमध्ये दिवाळीनिमित्त 1 नोव्हेंबर 2024 रोजी बँका बंद राहणार आहेत. तसेच कुट महोत्सव आणि कन्नड राज्योत्सवाच्या निमित्ताने देखील 1 नोव्हेंबर 2024 रोजी कर्नाटकात बँका बंद राहतील.

 

 

2 नोव्हेंबर

गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, सिक्कीम, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये 2 नोव्हेंबर 2024 रोजी दिवाळी, लक्ष्मीपूजन आणि गोवर्धन पूजनाच्या निमित्ताने बँका बंद राहतील.

 

3 नोव्हेंबर

3 नोव्हेंबर 2024 हा रविवार असल्याने देशभरातील बँका बंद राहतील. परंतु या दिवशी भाऊबीज असल्याने या निमित्ताने देखील बँकांना सुट्टी असते. रविवार आणि भाऊबीज एकत्र आल्याने भाऊबीजेची वेगळी सुट्टी नसेल.

 

कर्नाटक आणि महाराष्ट्रात 4 दिवसांची सुट्टी

कर्नाटक आणि महाराष्ट्रातील बँकांना दिवाळीनिमित्त सलग चार दिवस सुट्टी असणार आहे. त्यामुळे 31 ऑक्टोबर, 1 नोव्हेंबर, 2 नोव्हेंबर आणि 3 नोव्हेंबर (रविवार) अशा सलग चार दिवास बँका बंद राहणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!