ध्यास विश्वसार्ह बातमीचा

डिसेंबर अखेरच्या तिसऱ्या तिमाहित बॅक ऑफ इंडियाला 1 हजार 27 कोटीचा फायदा मागील वर्षीच्या 90 टक्क्यांनी वाढ

सोलापूर : बँक ऑफ इंडियाच्या निदेशक मंडळाकडून दि. 4 फेब्रुवारी 2022 रोजी झालेल्या बैठकीत जाहिर केल्यानुसार डिसेंबर 2021 अखेर संपलेल्या तिमाहित बँक ऑफ इंडियाला 1 हजार 27 कोटीचा फायदा झाला असून तो मागील वर्षाच्या 90.02 ट्न्नयाने नफ्यात वाढ झाल्याची सांगण्यात आले.

बँक ऑफ इंडियाच्या वतीने आर्थिक वर्षातील चार तिमाहित केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला जातो त्याच अनुषंगाने यंदाच्या सन 2021-22 या चालू आर्थिक वर्षाच्या सर्व तिमाहित बँक ऑफ इंडियाने चांगली कामगिरी केल्याचे दिसून आले मागील वर्षापेक्षा यंदाच्या वर्षातील कामगिरी सुधारली आहे.

या वर्षाची तिसरी तिमाहि डिसेंबर 2021च्या अखेर संपली त्यामध्ये बँकेन 1 हजार 27 कोटी नफा मिळवला म्हणजे मागील वर्षीच्या तिमाहिपेक्षा 90.02 टक्के इतकी वाढ झाली. यामध्ये संपत्तीवर परतावा 0.51 टक्के, वार्षिक बीपीएस वर 23 सुधारणा झाली. इक्वीटी परतावा 11.50 ट्न्नयावर 205 बीपीएस वार्षिक परतावा झाला. 13.16 टक्के सीईटी-1 बरोबर 16.66 ट्न्नयावर सीआरएआर शुध्द एनपीए अनुपात 2.66 टक्के वर क्रमिक रूपात 13 बीपीएस खाली आले.

तसेच ऑपरेटींग प्रॉफिट वाढला आहे. व्याजा व्यतिरिक्त उत्पन्नामध्ये ही वाढ झालेली आहे. रिटेल, कृषी कर्जामध्येही वाढ झालेली आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम व्यावसायिकांना देण्यात येणाऱ्या कर्जामध्ये मोठी वाढ झाली आहे. चालू आणि बचत खात्यामध्ये वाढ झाली आहे. कर्ज वाटप करताना त्याची वसुलीही चांगल्या पध्दतीने झालेली असून बँकेचा एनपीए कमी आला आहे बँकेने डिजिटल बँकींग मध्ये वाढ केलेली आहे इंटरनेट बँकींग, मोबाईल बँकींगमध्ये ग्राहकांची संख्या वाढत आहे.

विविध योजनांच्या माध्यमातून बँकेने अनेकांना आर्थिक हातभार दिला आहे. त्यातून अनेकांनी आपली प्रगती साधली आहे त्याचाच फायदा बँकेला झालेला आहे. बँक ऑफ इंडियाने सर्वच क्षेत्रात यंदाच्या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहित उल्लेखनीय कामगिरी केल्याने सर्व अधिकारी कर्मचारी आणि बँकेचे खातेदार हितचिंतक यांचा यामध्ये मोलाचा सहभाग असल्यानेच बँकेने प्रगती साधली त्यामुळे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!