सोलापूर, (प्रतिनिधी):- सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाला नुकत्याच संपलेल्या 31 मार्च 2021 या चौथ्या तिमाहीत 250.19 कोटीचा निव्वळ नफा झाल्याची नोंद वार्षिक अहवालामध्ये प्रसिध्द करण्यात आली. बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी ए. के. दास यांनी ही माहिती जाहिर केली.
बँकींग पलिकडचं नातं हे ब्रीद घेवून गेल्या 115 वर्षापासून भारतवासियांची सेवा करणाऱ्या बँक ऑफ इंडियाने बँकींग व्यवसायाबरोबरच सामाजिक भान ही जपले आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागाचाही विकास व्हावा तसेच गरीबातल्या गरीबापर्यत बँकेची सेवा देण्याचा प्रयत्न बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून झालेला आहे.
यंदाच्या 31 मार्च 2021 या आर्थिक वर्षापर्यतच्या चौथ्या तिमाहीत बँक ऑफ इंडियाने 250.19 कोटीचा शुध्द नफा मिळवला आहे. मागील 31 मार्च मध्ये बँकेला 3 हजार 571.41 कोटीचे नुकसान झाले होते. समिक्षा कालावधीत नोंद झालेला नफा डिसेंबर 2020-2021 मध्ये 540.72 कोटी रूपये नफ्यापेक्षा कमी आहे. बँक ऑफ इंडियाच्या 2020-21 या वार्षिक उत्पन्नामध्ये किरकोळ घट 48 हजार 40.93 कोटी इतकी झालेली आहे. जी एक वर्षापुर्वी 49 हजार 66.33 कोटी होती. 31 मार्च 2021 अखेर बँकेच्या संपत्तीच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा झालेली आहे.
एनपीए केवळ 13.77 टक्के राहिला आहे. मागील वर्षी बँकेचा एनपीए 14.78 टक्के इतका होता. कोरोनाच्या महामारीतही बँक ऑफ इंडियाने आपल्या व्यवसायामध्ये चांगली सुधारणा करीत नागरीकांना अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मार्चच्या तिमाहीत 2020 -21 मध्ये बँक ऑफ इंडियाने 11 हजार 379.84 कोटीचे उत्पन्न झाले असल्याचे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्यकार्यकारी अधिकारी ए.के. दास यांनी यावेळी सांगितले.
मागील वर्षी 12.215 कोटी इतकी होती. 2020-21 या पूर्ण आर्थिक वर्षात बॅँक ऑफ इंडियाने 2 हजार 160.30 कोटी रूपयाचा निव्वळ नफा कमावला आहे तर मागील वर्षी 2 हजार 956.89 कोटीचे नुकसान बँकेला सहन करावे लागले होते. देशातील सुरू असलेल्या कोरोनामुळे बँकींग क्षेत्रात अडचणीची परिस्थिती निर्माण झालेली असताना बँक ऑफ इंडियाने नफ्यात सुधारणा केली आहे.
बँक ऑफ इंडिया सोलापूर विभागाने अनेक सामाजिक क्षेत्रात आपला सहभाग नोंदवला आहे.अनेक उपक्रमांना सहकार्य केले आहे. सामाजिक भान ठेवून सीएसआर फंडातून लोेकोपयोगी उपक्रम राबवले तसेच कोरोनाच्या काळात प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम केले असून जिथे जिथे नागरीकांना अन्न पुरवठा करता येईल ते केले, मास्क,सॅनिटायझरचे वाटप केले तसेच कोरोनाच्या पूर्ण काळात बँकेच्या सर्वच कर्मचारी अधिकाऱ्यांनी नागरीकांना कोणताही त्रास न होता सेवा पुरवण्यात मोठे योगदान दिले आहे. हे करीत असताना आमचे काही सहकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली त्यात काही जणांना गमवावे लागले तर अनेकांना चांगल्या वैद्यकीय सुविधा पुरवण्यात आले. बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्यकार्यकारी अधिकारी ए के दास यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली बँकेने या आर्थिक वर्षात भरीव कामगिरी केली असल्याचे सोलापूर आंचलचे व्यवस्थापक अजयकुमार कडू यांनी सांगितले.