तोळणूर येथे बसवजयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, उद्या बाईक रॅली,३ मे पर्यंत चालणार कार्यक्रम
अक्कलकोट,दि.२६ : अक्कलकोट तालुक्यातील तोळणूर येथे श्री चन्नमल्ल महास्वामीजी यांच्या नेतृत्वात श्री गंगाधर स्वामी यात्रा महोत्सव व बसव जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.हे सर्व कार्यक्रम उद्या २७ एप्रिल पासून सुरू होत आहेत ते ३ मे पर्यंत चालणार आहेत.दररोज सायंकाळी ७ वाजता हे
कार्यक्रम पार पडणार आहेत.
आज सायंकाळी ४ वाजता तोळणूर ते नागणसुर श्री.बसवलिंगेश्वर विरक्त मठापर्यंत युवक मंडळ कडून बाईक रॅली काढण्यात येणार असून याद्वारे नागणसुर येथील श्री मठातून ज्योत आणण्यात येणार आहे. ७ वाजता शरण महातम्यांचे जीवन दर्शन प्रवचन कार्यक्रमाचे उदघाटन होणार आहे.बंडय्या शास्त्री प्रवचन सांगणार असून शिवकुमार गवई आणि संतोष कुडली हे संगीत सेवा देणार आहेत.एकूण सात दिवस प्रवचनमाला चालणार असून रोज भाविकांना महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे. प्रवचन कार्यक्रमात चन्नमल्ल महस्वामीजींचा तुलाभार कार्यक्रम संपन्न होणार आहे.तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या साधकांचा सत्कार
होणार आहे.३ मे रोजी सकाळी महारुद्राभिषेक,श्री जगज्योती बसवेश्वरांच्या प्रतिमेस पूजन,लिंगदीक्षा,अय्याचार
आणि रुद्राक्ष धारण आणि जंगम गणाराधाना
कार्यक्रम पार पडणार आहे.५ वाजता प्रवचन महामंगल,सुहासिनी ओटी भरणे कार्यक्रम व दीपोत्सव कार्यक्रम पार पडणार आहे.संपूर्ण कार्यक्रमात शिवशंकर शिवाचार्य महास्वामीजी तोळणूर,श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी नागणसुर,डॉ. श्री.अभिनव बसवलिंग महास्वामीजी नागणसुर,बसवलिंग महस्वामीजी अक्कलकोट,प्रभुशांत महास्वामीजी हत्तीकणबस,गंगाधर
शिवाचार्य महास्वामीजी अंबेजोगाई,केदार देवरू माशाळ,मलेंद्र शिवाचार्य महास्वामीजी अफजलपूर,शांतलिंगेश्वर महास्वामीजी दुधनी,प्रभुलिंग शिवाचार्य पडसावळगी,शांतलिंगेश्वर महास्वामीजी उडचण,अभिनव शिवलिंगेश्वर महास्वामीजी मादन हिप्परगी आदी महास्वामीजी उपस्थित राहून आशिर्वचन देणार आहे.तसेच सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य केलेल्या सुचित्रा थलंगे,राजेश जगताप,शिवकुमार खेड,कन्नड साहित्य परिषदेचे नूतन अध्यक्ष सोमशेखर जमशेट्टी आणि सर्व पदाधिकारी,तोळणूर ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच, सर्व सदस्य आणि कर्मचारी यांचे सत्कार होणार आहे.दररोज महाप्रसाद,विविध प्रकार सेवा करणारे सदभक्ताना महास्वामीजींच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.