---Advertisement---

गुरुवारी वटवृक्ष मंदिरात स्वामी पुण्यतिथी उत्सव, परंपरेप्रमाणे महाप्रसाद, पालखी सोहळयाचेही आयोजन

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.२६ : अक्कलकोट
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात (मुळस्थान) यंदा स्वामींचा पुण्यतिथी सोहळा मोठया उत्साहात संपन्न होत आहे.सालाबादप्रमाणे यंदाही श्री स्वामी समर्थ महाराजांचा १४४ व्या पुण्यतिथी महोत्सवा निमित्त दि. २८ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती चेअरमन महेश इंगळे यांनी दिली. पुण्यतिथी दिनी पहाटे २ वाजता काकड आरती होईल. त्यानंतर श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण होईल. पहाटे ३ ते ५ या वेळेत नगर प्रदक्षिणा पार पडेल. देवस्थान व अक्कलकोट राजघराण्याच्यावतीने श्रींना पारंपारिक लघुरुद्र सकाळी ६ वाजता करण्यात येईल. सत्संग महिला भजनी मंडळ यांच्या भजनाने नामवीणा सप्ताह समाप्ती सोहळा सकाळी ७ वाजता देवस्थानच्या ज्योतीबा मंडपात होईल. सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता दर्शन रांगेची सोय करण्यात आली असून स्वामी भक्तांच्यावतीने नित्यनियमाने होणारे अभिषेक भाविकांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता बंद ठेवण्यात आले आहेत. जे स्वामी भक्त अभिषेकाची पावती करतील त्यांना प्रसाद मिळेल. सकाळी ११:३० वाजता अक्कलकोट राजघराण्याच्यावतीने श्रीमंत मालोजीराजे भोसले यांच्या हस्ते श्रींना महानैवेद्य अर्पण करण्यात येईल. त्यानंतर श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा महानैवेद्य श्रींना दाखविण्यात येईल. दुपारी १२ ते ३ या वेळेत मंदिराच्या पुर्वेकडील उपहारगृहात सर्व स्वामी भक्तांना भोजन महाप्रसाद देण्यात येणार आहे. दुपारी २ ते ४ या वेळेत कोल्हापूर येथील महाद्वार स्वामी सेवा भजनी मंडळ यांची भजनसेवा देवस्थानच्या ज्योतीबा मंडपात संपन्न होईल. सायंकाळी ५:३० ते रात्री १० या वेळेत श्रींचा सजविलेला सवाद्य पालखी मिरवणूक सोहळा वटवृक्ष मंदिरातून निघेल. पालखी मार्ग फत्तेसिंह चौक, मेन रोड, कापड बाजार, कारंजा चौक, बुधवार पेठ, समाधी मठ, परतीचा मार्ग बुधवार पेठ, कारंजा चौक, दक्षिण पोलीस स्टेशन समोरून मौलाली गल्ली, सुभाष गल्ली, गुरू मंदिर, भारत गल्ली, देशमुख गल्ली, स्वामी गल्ली असे असेल. वटवृक्ष मंदिरात रात्री १० वाजता पालखी सोहळा आल्यानंतर देवस्थानच्या वतीने सर्व स्वामी भक्तांना शीरा प्रसाद वाटप करणेत येईल. २९ एप्रिल रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत मंदिरात गोपाळकाला होवून श्री स्वामी समर्थांच्या १४४ व्या पुण्यतिथी महोत्सवाचा सांगता समारंभ होईल.३० एप्रिल रोजी मंदिराच्या पुर्वेकडील उपहारगृह परिसरात सर्व स्वामी भक्त, सेवेकरी, भजनकरी, विणेकरी, प्रभात फेरीस येणारे भाविक, पारायणास बसलेले भाविक, देवस्थान कर्मचारी, सेवेकरी, सर्व पोलीस कर्मचारी यांना दुपारी १२ ते ३ या वेळेत भोजन महाप्रसाद देण्यात येणार आहे.तरी सर्व भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा, महाप्रसादाचा, पालखी सोहळा सेवेचा, व प्रसादाचा लाभ घ्यावा,असे आवाहन मंदिर विश्वस्त समितीच्यावतीने
करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!