भाविकांना सोयी सुविधा पुरविण्यास वटवृक्ष देवस्थान कटीबद्ध : इंगळे
नियोजित मुरलीधर मंदिर भक्त निवासाचे भुमीपुजन
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे स्वामी समर्थांचे मुळस्थान असून हजारो स्वामी भक्तांचे श्रद्धास्थान आहे. यानिमित्ताने सर्व स्वामी भक्तांना सुलभ स्वामी दर्शन व भक्त निवासाच्या माध्यमातून त्यांना निवासाची सर्वोत्तम सोई सुविधा पुरविण्या बरोबरच अनेक धार्मिक उपक्रमांसह स्वामी भक्तांना आधुनिक निवासाची सुविधा लाभावी या उद्देशाने मंदिर समितीच्यावतीने नियोजीत मुरलीधर मंदीर भक्तनिवासाचे भूमिपूजन पार पडले.या माध्यमातून भाविकांना सर्वोत्तम सोई सुविधा पुरविण्यास श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान विश्वस्त समिती नेहमीच कटीबध्द राहील,असे प्रतिपादन चेअरमन महेश इंगळे यांनी केले.
गुरूपुष्यामृताच्या शुभमुहूर्तावर येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित श्रीमंत मृदूलाराजे जयसिंहराजे भोसले मुरलीधर मंदिराच्या नियोजित मुरलीधर मंदिर भक्तनिवास बांधकामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला.मंदिर समितीचे सेक्रेटरी आत्माराम घाटगे व पुष्पा आत्माराम घाटगे यांच्या हस्ते पुरोहित मनोहर देगांवकर, संतोष देगांवकर, मनोज जहागिरदार आदी ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात मोठ्या भक्ती भावाने व
असिम श्रध्देने हा सोहळा संपन्न झाला.
या सोहळ्यास प्रथमेश इंगळे, विश्वस्त महेश गोगी,उज्वलाताई सरदेशमुख, संपतराव शिंदे, नवनाथ बनकर, वंदना बनकर, नामदेव फुलारी,राजेश निलवाणी, वरूण शेळके, सुनिल नायकोडी, प्राचार्य नागनाथ जेऊरे, चंद्रकांत गवंडी, विवेक कानडे, तिपण्णा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत श्री.स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पुजन व मुरलीधर मंदीर श्रीकृष्णांच्या मुर्तीचे पुजन करून या सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. उमरग्याचे आमदार ज्ञानराव चौगुले यांनी या सोहळ्यास सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी श्री.स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून आमदार ज्ञानराव चौगुले यांचा सत्कार इंगळे यांनी यांनी केला.
याप्रसंगी धनराज शिंदे, बाळासाहेब एकबोटे, सुनिल पवार, मनोज इंगुले, रवी कदम, सचिन किरनळ्ळी, चंद्रकांत सोनटक्के, संजय बडवे, चंद्रकांत पाटील आदींसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.शिवशरण अचलेर यांनी केले तर आभार प्रथमेश इंगळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता श्रीशैल गवंडी, रवी मलवे, दर्शन घाटगे, स्वामीनाथ लोणारी, काशिनाथ इंडे, ज्ञानेश्वर भोसले, रविराव महिंद्रकर, प्रसाद सोनार, गिरीश पवार, सागर गोंडाळ, विपूल जाधव, श्रीकांत मलवे, धनराज पाटील, किरण साठे, तुषार मोरे आदींनी परिश्रम घेतले.