ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शहांची सभा झाली म्हणून जागा भाजपची होत नाही !

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नुकतेच राज्याच्या दौऱ्यावर होते त्यांनी जळगाव व छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात सभा घेतल्याने राजकीय वातावरण तापविले आहे. त्यामुळे या वेळी लोकसभेला हा मतदारसंघ भाजपकडे येणार असल्याच्या चर्चेवर जवळपास शिक्कामोर्तबच झाले आहे. यावर आता शिंदेंच्या शिवसेनेचे राज्याचे कॅबिनेट मंत्री संदिपान भुमरे यांनी थेट इशारा दिला आहे.

मंत्री संदिपान भुमरे म्हणाले कि, छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. त्यामुळे यंदाही इथून शिवसेनेचाच म्हणजे आमचाच उमेदवार निवडणूक लढवेल. ही जागा भाजपला सोडण्याचा प्रश्नच उद‌्भवत नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

ते म्हणाले, ‘यवतमाळ इथे नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली. याचा अर्थ हा मतदारसंघ भाजपकडे गेला असे होत नाही. या ठिकाणी विद्यमान खासदार भावना गवळी या आमच्या शिवसेनेच्या आहेत. आताही तिथे शिवसेनेचाच उमेदवार लढेल. २०१९ मध्ये ज्या जागा शिवसेनेकडे होत्या, तिथे यंदाही आमचाच उमेदवार लढणार,’ असा पुनरुच्चार भुमरे यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला तर मीही संभाजीनगरात लढण्यास तयार आहे, असेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!