सोलापूर : प्रतिनिधी
येथील भगिनी समाजतर्फे पूरग्रस्तांना भांड्यांची मदत करण्यात आली. उपजिल्हाधिकारी अंजली मरोड यांच्याकडे मदत सुपूर्द करण्यात आली.
यंदाच्या वर्षी जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे भगिनी समाजतर्फे निधी जमविला. या रकमेतून पूरग्रस्तांना मदत देण्यात आली. ही मदत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पूरग्रस्तांना पोचविण्यासाठी उपजिल्हाधिकारी सौ. मरोड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी ट्रस्ट अध्यक्षा विशाला दिवाणजी, सचिवा सुवर्णा कटारे, भगिनी समाजच्या कार्याध्यक्षा राखी हैनाळ, सल्लागार विजया म्हमाणे, प्रेमलता वैद्य, प्रभा कोडले, अर्चना पवार आदी उपस्थित होते.