मोट्याळच्या शेतकऱ्यांने ५० गुंठ्यात घेतले भोपळ्याचे ९ लाखाचे उत्पन्न ; प्रयोगशील शेतीचा आधार घेत साधला फायदा
मारुती बावडे
अक्कलकोट ,दि.१० : अक्कलकोट तालुक्यातील मोट्याळ येथील युवा शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये डांगर भोपळ्याची शेती पिकवली असून फक्त ३ महिन्यात ५०
गुंठ्यामध्ये ९ लाखाचे विक्रमी उत्पन्न घेतले आहे.यामुळे परिसरातून कौतुक होत आहे.
प्रशांत कदम अशी शेतकऱ्याची ओळख असून त्याला लहानपणासुन शेतीची आवड आहे. शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करणे, प्रायोगिक तत्त्वावर शेती करणे, शेतीत नवंप्रयोग करणे, आधुनिकतेचा अंगीकार करून काहीतरी वेगळा प्रयोग करण्याच्या विचाराने नोव्हेंबर महिन्यात डांगर भोपळ्याची लागण केली. या पिकाचा कालावधी फक्त ९० दिवसाचा आहे.डांगर भोपळ्याचे वाण दिशा असून ५५० रुपयेचे १२ पाकीट घेतले त्यांनतर त्यांनी बियांची लागवड करून घेतले.सुरवातीला ८ हजार रुपयाचे खत ठिबक सिंचनद्वारे पहिला खतांचा मात्रा दिल्यानंतर वाटर सोलूशनद्वारे प्रत्येकी ४ दिवस पीक निघेपर्यंत ५० हजाराचे औषध घातले व त्या पिकाकरिता रोगराई होऊ नये म्हणून २५ हजार रुपयेची फवारणी करण्यात आली व पीक खुरपणे व कुळवणे याकरिता २० हजार रुपये खर्च आला असे एकूण १ लाख रुपयांचे खर्च झाला.२०फ़्रेबुवारी रोजी डांगर भोपळ्याची पहिली तोडणी झाली. आणि शेवटची तोडणी ५ मार्च रोजी झाली. हे डांगर भोपळा वाशी मार्केट नवी मुंबई येथे विकले गेले.डांगर भोपळ्याला सरासरी १४ ते २२ रुपये भाव लागला असून एकूण ६५ टन वजन मिळाले. अत्यंत कमी कालावधीत विक्रमी ९ लाखाचे उत्पन्न झाल्याने प्रशांत कदमचे अक्कलकोट तालुक्यातून कौतुक होत असून परिसरातील शेतकरी त्यांच्या शेतीला भेट देत आहेत.
अपयशाने
खचू नका
अपयशाला न जुमानता आपण कबाड कष्ट केल्यास यश हमखास मिळते. शेतकऱ्याला पोसिंदा असे म्हटले जाते प्रत्येक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ग्रुप बनवावे व बाजारपेठ भावाच्या अंदाजनुसार प्रत्येकानीं पिकांची लागण करावी बाजार पेठच्या भावाकडे लक्ष न देता पिकांचे उत्पादन जास्त कसे निघेल याकडे लक्ष केंद्रित करावे.यासाठी मित्र चमनलाल शेख यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रशांत कदम, मोट्याळ