मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारची महत्वाची योजना असलेल्या लाडकी बहिण योजनेट आता लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळामध्ये काही बदल होत आहेत, त्यामुळे वेळ लागत आहे. ज्या महिलेला पती आणि वडील नाही त्यांना केवायसी करता येत नाही. हीच अडचण लक्षात घेऊन आता संकेतस्थळात महत्त्वाचे बदल केले जात आहेत. या बदलांमुळे आता सर्व महिलांना केवायसी करता येईल. त्यासाठीच हे बदल केले जात आहेत, असे तटकरे यांनी सांगितले आहे.
केवायसी करण्याची अंतिम मुदत १८ नोव्हेंबर २०२५ आहे. त्यामुळे लवकरात लवकर केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महिलांचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, सध्या संकेतस्थळात काही बदल केले जात असून त्यामुळे वेळ लागत असल्याची माहिती तटकरे यांनी दिली आहे. तर मग अंतिम मुदत वाढवून देणार का? असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला आहे. यावर आता सरकार काय निर्णय घेणार याकडे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळावर सध्या केवायसी करताना खूप अडचण येत आहे. या तांत्रिक अडचणीवर तटकरे यांनी भाष्य करताना म्हटले की, महिलांना येत असलेली तांत्रिक अडचण लक्षात घेण्यात आले आहेत. सध्या संकेतस्थळात काही बदल करण्यात येत आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.