ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्य सरकारचा मोठा निर्णय : शाळेतील शिक्षकांना ड्रेस कोड होणार लागू

मुंबई : वृत्तसंस्था

मुंबईसह राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षकांना आता ड्रेस कोड लागू होणार आहे. सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील पुरुष व महिला शिक्षकांना शाळा निश्चित करेल, अशा रंगाचा एकच ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घे तला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तसेच शिक्षकांच्या खासगी वाहनांवर ‘टी’ असे संबोधन लावण्यास परवानगी दिल्याचे केसरकर म्हणाले.

मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केसरकर यांनी ही माहिती दिली. शिक्षक हा भावी पिढी घडवत असतो. विद्यार्थी हे अनुकरणप्रिय असल्याने शिक्षकांनी घातलेल्या पेहरावाचा त्यांच्या मनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. शिक्षकांचा पोशाख हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनुसरून असायला हवा. त्यामुळे शिक्षकांना ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. महिला शिक्षकांना साडी अथवा सलवार-चुडीदार, कुर्ता, दुपट्टा असा पेहराव अस णार आहे. तर पुरुष शिक्षकांना शर्ट-ट्राऊझर पँट असा पोषाख असेल. शर्ट इन असावा. गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम किंवा चित्र असलेले पेहराव घालू नयेत. तसेच शिक्षकांनी जीन्स, टी-शर्टचा वापर शाळेमध्ये करू नये, या मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत. पुरुषांना शूज घालावे लागतील. वैद्यकीय कारण असेल तर बूट घालण्यापासून सूट दिली जाईल. तर स्काऊट गाईडच्या शिक्षकांना स्काऊट गाईडचाच ड्रेस बंधनकारक राहील, असे केसरकर म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!