नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील चार राज्यात नुकतेच विधानसभेची निवडणूक झाली असून त्यातील राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील विधानसभेत भाजपचा जोरदार विजय झाला. भाजपने तब्बल २१ खासदारांना या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. यातील १२ खासदारांनी विजय मिळवला तर ९ जणांचा पराभव झाला आहे. विधानसभेत विजयी झालेल्या १० खासदारांनी लोकसभा खासदारकीचा राजीनामा दिलाय.
All BJP MPs, who contested and won the State Assembly Elections have resigned. As of now, a total of 10 MPs have resigned. Two other MPs Baba Balaknath & Renuka Singh did not come today.
BJP President J.P. Nadda led the delegation of these MPs during the meeting with the PM, Lok…
— ANI (@ANI) December 6, 2023
राजीनामा दिलेल्यां खासदारांमध्ये खासदार किरोरी लाल मीना, राज्यवर्धन सिंह राठोड, नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद सिंग पटेल, राकेश सिंग, उदय प्रताप, रीती पाठक, अरुण साओ, गोमती साई, दिया कुमारी आणि किरोनी लाल मीना यांनी आज राजीनामा दिला.