---Advertisement---

मोठी बातमी : माजी मुख्यमंत्री चव्हाणांनी घेतली जरांगे पाटलांची भेट

By team
On: August 23, 2024 10:42 AM
Follow Us:
---Advertisement---

वडीगोद्री : वृत्तसंस्था

राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली असतांना नुकतेच मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी अधिकार नसताना चुकीच्या पद्धतीने आरक्षणाचा कायदा केला. त्यामुळे आरक्षण टिकले नाही, असा आरोप काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. अंतरवाली सराटी येथे दि.२२ चव्हाण आणि रजनीताई पाटील यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली. यावेळी बंद दरवाजाआड दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

या भेटी दरम्यान कोणतीही राजकीय चर्चा मनोज जरांगे यांच्यासोबत झाली नाही. त्यांच्या तब्बेतीची विचाररपूस करण्यासाठी येथे आलो होतो, असे चव्हाण यांनी सांगितले. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी अधिकार नसताना चुकीच्या पद्धतीने मराठा आरक्षणाचा कायदा केला. त्यामुळे आरक्षण टिकले नाही, असा आरोप चव्हाण यांनी यावेळी केला. तर आमच्यात राजकीय चर्चा झाली नाही. पृथ्वीराज चव्हाण यांनी तब्येतीची विचारपूस केली आणि आरक्षणाबाबत चर्चा झाली, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!