मुंबई : वृत्तसंस्था
देशाच्या अर्थसकंल्पाच्या आधी २२ जुलै रोजी शुद्ध सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ७३,२१८ रुपये होता. पण २३ जुलै रोजी अर्थसंकल्पातून सोने- चांदीवरील कस्टम ड्युटीत कपात केल्याच्या घोषणेनंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली.
गेल्या ४ दिवसांत २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅममागे ५,१४९ रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर ४,७१७ रुपयांनी कमी झाला आहे. चांदीच्या दरात चार दिवसांत प्रति किलोमागे ६,८६० रुपयांची घट झाली आहे. आज शुद्ध सोने म्हणजे २४ कॅरेटचा दर प्रति १० ग्रॅम ६८,०६९ रुपयांवर खुला झाला आहे. तर चांदीचा दर प्रति किलो ८१,३३६ रुपयांवर आला आहे.
२४ कॅरेट- ६८,०६९ रुपये
२२ कॅरेट- ६२,३५१ रुपये
१८ कॅरेट- ५१,०५२ रुपये
१४ कॅरेट- ३९,८२० रुपये
चांदीचा दर – प्रति किलो ८१,३३६ रुपये