मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचा जोर वाढत असतांना नुकतेच आता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे संजय राऊत यांच्यावर या महिलेच्या आरोपानंतर विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल होत आहे. या प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी या महिलने उद्धव ठाकरे यांनाही पत्रही लिहिले होते. त्या नंतर आता या महिलेने ईडीच्या अतिरिक्त संचालकांना पत्र लिहून आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. स्वप्ना पाटकर असे या महिलेचे नाव आहे.
स्वप्ना पाटकर यांनी संजय राऊत यांच्यावर धमकावणे, पाठलाग करणे आणि छळ केल्याचा आरोप केला आहे. एवढेच नाही तर स्वप्ना पाटकर नावाच्या या महिलेने शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून संजय राऊत यांच्यावर हे गंभीर आरोप केले आहेत. आता तर थेट ईडीच्या अतिरिक्त संचालकांना पत्र लिहिले आहे. वास्तविक संजय राऊत यांच्यावर सध्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आरोप असून ते जामिनावर बाहेर आहेत. आता या महिलेच्या पत्रानंतर संजय राऊत पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.
पत्रा चाळ प्रकरणातील साक्षीदार असलेल्या स्वप्ना पाटकर यांनी पत्रात संजय राऊत यांचे नाव स्पष्टपणे घेतले आहे. ईडीच्या पश्चिम विभागाच्या अतिरिक्त संचालकांना हे पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, ‘मला तुमच्या निदर्शनास आणायचे आहे की, या प्रकरणातील आरोपी आणि त्यांचे गुंड मला सतत धमकावत आहेत आणि इतर साक्षीदारांनाही अशाच प्रकारे धमक्या दिल्या जाण्याची शक्यता आहे. माझा जबाब बदलण्यासाठी माझ्यावर दबाव निर्माण केला जात असून, या प्रकरणातील आरोपी संजय राऊत आणि त्याच्या कुटुंबीयांवर नोंदवलेले आरोप बदलण्यासाठी हा दबाव निर्माण केला जात आहे.