---Advertisement---

माझा राजीनामा मागितल्याशिवाय त्यांना अन्नच पचत नाही ; फडणवीसांचा हल्लाबोल

By team
On: August 31, 2024 4:29 PM
Follow Us:
---Advertisement---

नागपूर : वृत्तसंस्था

राज्यात निवडणुकीपूर्वी सत्ताधारी व विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले असून नुकतेच नागपूर येथे पोलिस पाटील संघटनेशी संवाद साधताना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला आहे.

देवेंद्र फडणवीस म्ह‌णाले, मी राज्याचा गृहमंत्री आहे मात्र पोलीस पाटील हे त्यांच्या त्यांच्या गावाचे गृहमंत्रीच आहात हे विसरु नका. खरं म्हणजे गृहमंत्री म्हणून काम करताना शिव्याच जास्त खाव्या लागतात. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. खरे म्हणजे गृहमंत्री म्हणून काम करताना शिव्याच जास्त खाव्या लागतात. काही लोकांचा शौक असा आहे की सकाळी उठून कॅमेरासमोर येऊन माझा राजीनामा मागितल्याशिवाय त्यांना अन्नच पचत नाही. एखाद्या दिवशी माझा राजीनामा मागितला नाही तर त्यांना अपचन होते. पण पोलीस पाटील संघटना अशी आहे की ज्यांनी मागे लागून त्यांचे काम करुन घेतले. पण कुणी काम केले ते ही संघटना विसरली नाही. आज मला इथे बोलवून माझा सत्कार केलात त्याबद्दल आपले आभार मानतो.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मानाच्या पदाला सन्मान मिळणे आवश्यक असते. काळाच्या ओघात व्यवस्था बदलली, लोकशाहीत अनेक संस्था तयार झाल्या. मानाच्या पदाचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न चालला आहे का? अशी शंका उपस्थित होते. मला पोलीस पाटील संघटनेचे लोक भेटायचे तेव्हा मला ते सांगायचे आम्हाला हिणवले जाते, बिन पगारी फुल अधिकारी. मी त्यांना सांगीतले काळजी करु नका, फुल पगारी आणि फुल अधिकारी असाच दर्जा आम्ही तुम्हाला देणार आहोत.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, संघटनेचे लोक मला भेटले तेव्हा मी चंग बांधला, मानाच्या पदाला आम्ही १५ हजार रुपये मानधन केले. तुम्ही काळजी करु नका, दोन तीन दिवसांपूर्वी सांगितले असते तर मी पैसे खात्यात जमा करुनच आलो असतो. सोमवारी जी. आर. निघून पैसे खात्यात गेले पाहिजेत, असा आदेश मी दिला आहे. चार महिन्यांचे पैसे खात्यात जातील आणि दर महिन्याला योग्य प्रकारे तुमच्या खात्यात येतील.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!