ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मोठी बातमी : संसदेच्या बाहेर फटाके फोडून दोघे शिरले सभागृहात !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशाचे सर्वात महत्वाचे मानले जाणारे संसद भवनाच्या बाहेर दोन जणांनी फटाके फोडले. घोषणाबाजी केली. त्यानंतर हे दोघेही गॅस घेऊन प्रेक्षक गॅलरीत आले. तिथून हे दोघेही सभागृहात शिरले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. अचानक एक स्त्री आणि एक पुरुष सभागृहात आल्याने सर्वचजण धस्तावले. संसद कोणतीही परवानगी नसताना आणि सभागृहाचे सदस्य नसताना दोन जण आत शिरल्याने सुरक्षा रक्षकांचीही तारांबळ उडाली. या दोघांना पकडण्यासाठी एकच धावपळ सुरू झाली. या निमित्ताने संसदेच्या सुरक्षेचा पुन्हा एकदा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर लोकसभेचं कामकाज काही काळासाठी स्थगित करण्यात आलं.

एक महिला आणि पुरुष एका खासदाराच्या पासवर संसदेत शिरले. संसदेच्या बाहेर आधी त्यांनी फटाके फोडले. यावेळी त्यांनी भारतमाता की जय, तानाशाही नही चलेगी… आदी घोषणा दिल्या. ट्रान्स्पोर्ट भवनाच्या बाहेर हा गोंधळ घालण्यात आला. यावेळी त्यांनी पिवळ्या रंगाचा गॅसही फोडला. त्यामुळे संसद भवन परिसर पिवळा झाला होता. त्यानंतर हे दोघेही संसदेच्या प्रेक्षक गॅलरीत आले. यावेळी त्यांनी जोरजोरात घोषणा देत संसद सभागृहात प्रवेश केला.

अचानक दोन अज्ञात व्यक्ती संसदेच्या सभागृहात आल्याने एकच खळबळ उडाली. या दोघांना पकडण्यासाठी सुरक्षा रक्षक धावले. हे दोघेही सभागृहात इकडून तिकडे पळत होते. खासदारही या दोघांना पकडण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या हातात टिअर गॅस होता. हा पिवळा गॅस घेऊन ते सभागृहात शिरले होते. त्यामुळे सर्वच जण धस्तावले होते. अखेर सुरक्षा रक्षकांनी या दोघांना जेरबंद केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!