---Advertisement---

मोठी बातमी : माओवाद्यांच्या हल्ल्यात एक जवान शहीद

By team
On: December 13, 2023 2:19 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशातील छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात माओवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात छत्तीसगड सशस्त्र दलाचा (सीएएफ) एक जवान शहीद झाला आहे. तर एक जवान जखमी झाला असून बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास आमदाईघाटी लोहखनिज खाण परिसरात हा स्फोट घडवून आणला आहे.

आमदाईघाटी लोहखनिज खाण परिसरात सीएएफचे जवान गस्त घालत असताना माओवाद्यांकडून बेछूट गोळीबार करण्यात आला. सीएएफच्या जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. बराचवेळ माओवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू होती. यादरम्यान माओवाद्यांनी आईडीचा स्फोट घडवून आणला. यात एक जवान शहीद झाला आहे तर एक जखमी झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!