ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मोठी बातमी : उद्धव ठाकरे यांच्यावर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अ‍ॅन्जिओप्लास्टी झाल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर एचएन रिलायन्स रुग्णालयात अ‍ॅन्जिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. उद्धव ठाकरे स्वत:चं मेडीकल रुटीन चेकअप करण्यासाठी मुंबईतील एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये सकाळी आठ वाजता दाखल झाले होते. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांची रुटीन चेकअप केली त्यावेळेस त्यांच्या रक्त वाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आढळून आले. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना अ‍ॅन्जिओप्लास्टीचा सल्ला दिला.

त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्यावर अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर 2012 मध्ये सुद्धा अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आढळून आले होते. पण आता थोड्या वेळापूर्वी त्यांच्यावर सुखरुप अ‍ॅन्जिओप्लास्टी झालेली आहे.

उद्धव ठाकरे गेल्या काही दिवसांपासून अतिशय आक्रमकपणे फिरताना आणि प्रचार करताना पाहायला मिळत आहेत. त्यातच त्यांना मेडिकल रुटीन चेकअप करत असताना ब्लॉकेज आढलून आल्यामुळे डॉक्टरांनी अ‍ॅन्जिओप्लास्टीचा सल्ला दिला. त्यानुसार अ‍ॅन्जिओप्लास्टी झाली आहे. तसेच थोड्याच वेळाने उद्धव ठाकरे यांना एचएन हॉस्पिटलमधून डिस्चार्ड मिळणार असल्याची देखील माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!