मुंबई : वृत्तसंस्था
देशभरात आगामी काळात निवडणुकीचा बिगुल वाजला असून आतापासून राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोप सुरु झाले असून आता अजित पवार यांचे मावळ आणि पिंपरी चिंचवडमधील विश्वासू सहकारी संजोग वाघेरे यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मातोश्रीवर त्यांचा हा पक्षप्रवेश पार पडला. याप्रसंगी कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित होते.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले” मला भावूक आणि घाऊक याचा फरक कळायला लागला. ज्यांनी 50 खोके घेतले त्यांना आता खोक्यामध्ये बंद करायचं आहे. गद्दार आणि स्वाभिमानी हा फरक संजोग यांनी दाखवून दिला. जिथे सत्ता असते तिथे गर्दीचा ओघ असतो. पण इथे वेगळे आहे. मला तिकडे प्रचाराला यायची गरज नाही. आजच भगवा तिकडे मावळमध्ये फडकला”, असे ठाकरे म्हणाले.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, ”हा मावळ मतदार संघ वेगळा आहे. मी प्रचाराला तर येईलच. नरेंद्र मोदी यांचे कर्तृत्व 10 वर्ष पाहिले आहे. होऊ दे चर्चा कार्यक्रम गावागावात सुरू करा. आता निवडणूक कशी जिंकायची हे मला सांगायची गरज नाही. जिथे शिवाजी महाराज जन्माला आले तिथे आता गद्दारी गाडायची आहे”, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला.