---Advertisement---

मोहिते पाटलांना मोठा धक्का : समर्थकांचा अजित पवार गटात प्रवेश !

By team
On: September 14, 2024 8:32 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : वृत्तसंस्था

राज्यात आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर असताना अनेक ठिकाणचे राजकीय समिकरणं बदलू लागली आहेत. सोलापूरमध्ये देखील राजकीय घडामोडींना वेग आला असून सोलापुरातील माढ्याचे अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांनी मोहिते पाटलांना मोठा धक्का दिला आहे. मोहिते पाटलांच्या समर्थकांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतचे नगरसेवक प्रकाश नवगिरे यांनी समर्थकासह राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. प्रकाश नवगिरे यांनी समर्थकांसह राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करतानाच विधानसभा निवडणुकीसाठी पाठिंबा देखील दर्शवला आहे.

प्रकाश नवगिरे यांचा जनसंपर्क चांगला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आमदार बबनराव शिंदे यांना मोठा फायदा होऊ शकतो. त्यांचा कार्यकर्त्यांशी मोठ्या प्रमाणात जनसंपर्क असणारा नेता बबनराव शिंदे यांच्या गळाला लागला आहे. मोहिते पाटील यांच्या माळशिरस तालुक्यात नगरपंचायतमध्ये आमदार बबनराव शिंदे गटाची नगरसेवक संख्या नगराध्यक्षांसह 8 इतकी झाली आहे.

माढा विधानसभा मतदारसंघात आमदार बबनराव शिंदे यांनी मोहिते पाटील गटाला जोरदार राजकीय धक्का दिला आहे. महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतचे नगरसेवक प्रकाश नवगिरे यांनी त्यांच्या समर्थकासह माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांना समर्थन दिलं आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर बबनराव शिंदे यांना मिळणारं समर्थन वाढलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!