ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापुरात प्रणिती शिंदेंचा मोठा विजय ; सातपुतेंचा पराभव

सोलापूर : वृत्तसंस्था

देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम आज सकाळपासून सुरु होती. तर सायंकाळी सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी विजयी गुलाल उधळला असून शिंदे यांनी भाजपच्या राम सातपुते यांचा पराभव केला. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सोलापूर मतदारसंघात 2 टर्मपासून भाजपनं बाजी मारली होती. 2014 आणि 2019 मध्ये भाजपने सोलापुरात विजय मिळवला होता. सुशील कुमार शिंदे यांना पराभव झाला होता. 2024 निवडणुकीत प्रणिती शिंदे यांनी विजय मिळवत भाजपला रोखलं. सोलापूर लोकसभा मतदारसंघ अनुसुचित जाती (SC) साठी राखीव आहे.

24व्या फेरीनंतर सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना 606278 मते मिळाली. तर भाजपच्या राम सातपुते यांना 524657 इतकी मते मिळाली आहे. प्रणिती शिंदे यांच्याकडे सध्या 81 हजार 621 मतांची मोठी आघाडी आहे. अखेरच्या एक ते दोन फेऱ्यात ही लीड तुटनं कठीण दिसतेय. त्यामुळे सोलापुरात प्रणिती शिंदेच्या विजयाचा मार्ग मोकळा झालाय. दरम्यान, प्रणिती शिंदेना पाठिंबा देणाऱ्या माजी आमदार नरसाय्या आडम यांनी जल्लोष केला. लोकसभा निवडणुकीत माकप आमदार नरसय्या आडम यांनी काँग्रेसला दिला होता पाठिंबा

लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर सोलापुरात तिरंगी लढत होती. काँग्रेस, भाजपसह वचिंतनेही आपला उमेदवार रिंगणात उतरवला होता. 2019 मध्ये वचिंत आघाडीकडून प्रकाश आंबेडकरांनी निवडणूक लढवली होती. ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते, पण त्याचा फटका काँग्रेसला बसला होता. यंदा मात्र प्रकास आंबेडकर यांनी वचिंतकडून राहुल गायकवाड यांना रिंगणात उतरवले होतं. मात्र, गायकवाड यांनी ऐनवेळी माघार घेत काँग्रेसमध्येच प्रवेश केला. त्यामुळे वचिंतने अपक्ष उमेदवार अतिष बनसोड यांना पाठिंबा जाहीर केला. मात्र तरीही प्रकाश आंबेडकरांची जादू म्हणावी तितकी चालली नसल्याचे दिसले. मोहोळ 63.15, सोलापूर शहर उत्तर 59.15, सोलापूर शहर मध्य 56.51, अक्कलकोट 59.17, सोलापूर दक्षिण 58.28, पंढरपूर 59.04 मतदान झाले, असे एकूण अंदाजित मतदानाची टक्केवारी 59.19 टक्के झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!