ध्यास विश्वसार्ह बातमीचा

15 कोटीचा अपहार केल्याप्रकरणी भाजप आमदारासह 16 जणांवर गुन्हा दाखल

औरंगाबाद : गंगापूर कारखान्यातील निधीची अफरातफर केल्याप्रकरणी भाजप आमदार प्रशांत बंब यांच्यासह सोळा जणांवर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत बंब हे गंगापूर साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर पोलीस ठाण्यात यासंबंधी तक्रार करण्यात आली आहे. प्रशांत बंब यांनी बनावट कागजपत्रं तयार करून सभासदांची फसवणूक करत 15 कोटी 75 लाखांचा अपहार झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यानंतर कारखान्यातील सभासदांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला गेला. पोलिसांनी याची नोंद घेत प्रकरणाचा शोध सुरू केला असल्याची माहिती आहे. दरम्यान, गंगापूर साखर कारखान्याची विक्री होऊ नये यासाठी सभासदांनी काही पैसे जमा केले होते. ते पुन्हा कारखान्याच्या खात्यावर आले. तेव्हा ही रक्कम 15 कोटी 75 लाख होती. पण खात्यावर आलेल्या या पैशांचा कारखान्याशी काहीही संबंध नाही असं कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत बंब आणि त्यांच्या काही संचालकांनी सांगितलं. यामुळे सभासदांनी एकत्र येत पैशांचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल केला.

 

यामुळे आता प्रकरणात पोलीस अधिक तपास करत असून प्रशांब बंब यांचीही चौकशी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडून न्याय मिळाला नाही तर कारयदेशीर कारवाई करू असंही सभासदांकडून म्हणण्यात आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!