---Advertisement---

बसवराज पाटील यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश

Follow Us:
---Advertisement---

मुरुम : मुरुम येथील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचे शहराध्यक्ष व मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राम डोंगरे, बंजारा समाजाचे अध्यक्ष बाला राठोड, तानाजी राठोड, आनंद नगर ग्रामपंचायत सदस्य भिमराव कांबळे, माजी सदस्य राम राठोड, आदींसह परिसरातील भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षातील एकाधिकारशाहीला कंटाळून आज बुधवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा बाजार समितीचे सभापती बापुराव पाटील यांच्या हस्ते नुतन सदस्यांना कॉंग्रेस पक्षाचा दुपट्टा घालुन सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत करण्यात आला. काँग्रेसमध्ये येणाऱ्या कार्यकर्त्यांचा ओघ वाढला असून मागील महिनाभरात मुरूम परिसरातील शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत.

यावेळी उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष विजयकुमार सोनवने, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस महालिंग बाबशेट्टी, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल वाघ, मुरूम शहराध्यक्ष सुधीर चव्हाण, माजी नगराध्यक्ष बबन बनसोडे, विकास हराळकर, मुरूम सोसायटीचे चेअरमन दत्ता चटगे, दिलीप शेळके, युवक काँग्रेसचे श्रीहरी पाटील, राजु मुल्ला, किरण गायकवाड, देवराज संगुळगे, महेश शिंदे, विकास शिंदे आणि इतर कर्यकर्ते उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!