ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भाजपचा जाहीरनामा म्हणजे निव्वळ धूळफेक ; ठाकरेंची टीका

मुंबई : वृत्तसंस्था

मोदींचे सरकार म्हणजे हुकूमशाहीची शंभर टक्के गॅरंटी. भारतावर भाजपचा हल्ला सुरू आहे असा हल्लाबोल ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. ”मोदींचे सरकार म्हणजे हुकूमशाहीची शंभर टक्के गॅरंटी. मोदींचे उमेदवार जागोजाग सांगतात की, देशाचे संविधान बदलण्यासाठी त्यांना चारशे खासदार निवडून आणायचे आहेत. हे सर्व रोखावेच लागेल. युवा, शेतकरी, महिलांना सन्मानाने जगण्याची हमी नसलेला भाजपचा जाहीरनामा म्हणजे निव्वळ धूळफेक आहे. शिक्षण, आरोग्याच्या योजना कागदावरच राहतील. भाजपच्या जाहीरनाम्यावर 2014 आणि 2019 मध्ये लोकांनी विश्वास ठेवला, मात्र आता 2024 मध्ये विश्वास ठेवता येणार नाही. भाजपचा जाहीरनामा आणि मोदींची गॅरंटी म्हणजे भारतीय जनतेवर ‘ड्रोन हल्ला’च आहे!”, अशी खोचक टीका ठाकरे गटाने केली आहे.

”इराणने इस्रायलवर हल्ला केला आहे. 300 ड्रोन मिसाईलचा मारा या हल्ल्यात करण्यात आला. भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी जो जाहीरनामा प्रसिद्ध केला हादेखील भारतीय जनतेवरचा ‘मिसाईल’ आणि ‘ड्रोन’ हल्लाच म्हणावा लागेल. जनतेला फसवणारा, आधीच्या आश्वासनांना हरताळ फासून पुढच्या पाच वर्षांसाठी फेकमफाक करणारा भाजपचा जाहीरनामा म्हणजे देशाची व जनतेची क्रूर चेष्टाच आहे. युवा, महिला, शेतकरी, गरीबांना सशक्त करणारा, समान नागरी कायदा लागू करणारा, ‘एक देश, एक निवडणूक’ अशी मोदी गॅरंटी देणारा भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. त्यात नवे असे काहीच नाही. मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत केलेल्या घोषणांचा धुरळा पुन्हा उडवला आहे”, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.

”आंदोलन करणाऱया शेतकऱ्यांवर गोळ्या झाडणारे मोदी निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचा पैवार घेतात, पण निवडणूक जिंकताच शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसतात. प्रभू श्रीरामांसाठी सर्वत्र सजावट करतात. रांगोळय़ांचे सडे पाडतात, पण शेतकऱ्यांच्या वाटेत खिळ्यांच्या रांगोळ्या टाकून अधम कृत्य केले जाते. शेतकरी सशक्त होऊ नये यासाठीच हा खटाटोप आहे. मोफत रेशन योजना पुढील पाच वर्षे चालूच ठेवण्याची घोषणा मोदी यांनी केली. किमान 80 कोटी लोकांना माणशी पाच किलो धान्य फुकट देणे म्हणजे 80 कोटी लोकांना पुढची पाच वर्षे गरीब व गुलाम ठेवण्याची मोदी गॅरंटीच आहे”, असा हल्लाबोल ठाकरे गटाने केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!