मुंबई : वृत्तसंस्था
वंचित बहुजन आघाडीचे (व्हीबीए) प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आमच्या शिवसेना (उबाठा) गटासोबतची आघाडी तोडणे एकतर्फी व दुर्दैवी आहे. त्यांनी अशी घोषणा करण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करायला हवी होती, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी रविवारी दिली. साताऱ्यातून उमेदवारी मिळावी म्हणून उदयनराजे भोसले पाच दिवसांपासून वेटिंगवर आहेत. सातारा ही छत्रपती शिवरायांची गादी आहे. भाजपला शिवरायांच्या गादीचा मान राखता येत नाही. त्यामुळे उदयनराजेंनी विचार करायला पाहिजे, असा टोला राऊ तांनी लगावला आहे.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक एकत्र लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीशी आघाडी केली होती. मात्र, जागावाटप व इतर मुद्यांवर मतैक्य झाले नसल्यामुळे अखेर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वंचित व शिवसेना (उबाठा) आघाडी अस्तित्वात नसल्याची घोषणा केली. त्यावर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, एका वर्षापूर्वी उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीची घोषणा केली.