बैलगाडा शर्यतीमुळे ग्रामीण भागात पशुधनाला वाव : म्हेत्रे
हन्नूर येथे के.बी प्रतिष्ठानतर्फे बैलगाडा शर्यतीचे आयोजन
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
यांत्रिकीकरणामुळे दिवसेंदिवस पशुधन घटत चालले आहे.या पार्श्वभूमीवर हन्नूरच्या के.बी प्रतिष्ठानने घेतलेला बैलगाडा शर्यतीचा उपक्रम स्तुत्य आहे,असे प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले.हन्नूर (ता.अक्कलकोट ) येथे त्यांच्या हस्ते बसवेश्वर केसरी बैलगाडा सीजन १ चे उद्घघाटन करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना म्हेत्रे म्हणाले की, ग्रामीण भागातच या स्पर्धा टिकून आहेत. विज्ञानामुळे जगात अनेक बदल होत आहेत परंतु याचा अर्थ असा नाही की जुन्या गोष्टी आणि परंपरा आपण विसरावेत.त्यासाठी हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. यावेळी सोसायटीचे चेअरमन विश्वनाथ भरमशेट्टी,मल्लिकार्जुन पाटील ,बाबासाहेब पाटील,सिद्धार्थ गायकवाड,राजू भरमशेट्टी,चंद्रकांत जंगले,तुकाराम दुपारगुडे,नरेंद्र जंगले,सिद्धाराम भंडारकवठे,नंदू चव्हाण,झूम नदाफ,विनीत पाटील आदींची उपस्थिती होती.या स्पर्धेत एकूण ४५ बैल गाड्या सहभागी झाल्या होत्या.प्रथम बक्षीस होंडा शाईन गाडी रमेश भरमशेट्टी यांना मिळाली.दुसरे बक्षीस हूचलिंगेश्वर ग्रुप ,तोळणूर यांना ५१ हजार रुपये रोख ,तिसरे बक्षीस तुकाराम पवार,करदेहळळीयांना २१ हजार तर भागणा प्रचंडे ,नागणसुर यांना उत्तेजनार्थ म्हणून ११ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
याचे वितरण युवा नेते रमेश सिद्रामप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी तुकाराम बिराजदार,गोटू मंगरुळे,बसवणप्पा सुतार,सोपान निकते, निरंजन हेगडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.ही स्पर्धा आता दरवर्षी सुरू राहणार आहे.यात तालुक्यातील पशुपालक सहभागी होऊ शकतील. पशुसंवर्धनाला वाव मिळावा यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे, असे विश्वनाथ भरमशेट्टी यांनी सांगितले.ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी के.बी प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैभव भरमशेट्टी,रमेश छत्रे,प्रकाश हताळे, महेश चितले,बसवराज पारतनाळे,विठ्ठल पारतनाळे,केदार कोरे,धोंडप्पा पुजारी, उत्तम बाळशंकर,प्रशांत भरमशेट्टी,राजू सुतार,स्वामींनाथ रोट्टे,संतोष घोडके,महादेव बंदिछोडे,विश्वनाथ बंदिछोडे आदींनी परिश्रम घेतले.