---Advertisement---

औरंगजेबाच्या वारसदारांच्या पालख्या वाहत आहात ; बावनकुळेंचा ट्विटवार

By team
On: August 11, 2024 2:08 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

आगामी विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली असून सत्ताधारी व विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले असून नुकतेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केले आहे.

उद्धव ठाकरे औरंगजेबाच्या वारसदारांच्या पालख्या वाहत असतात. येणाऱ्या निवडणुकीत वाघनखे त्यांचा हिरवा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही असा हल्लाबोल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. तसेच ही तुमच्या अधोगतीची सुरूवात आहे असे ते म्हणाले.

ट्विट करत बावनकुळे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ते म्हणाले, ”औरंगजेब फॅन क्लबचे म्होरके जनाब उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात जाऊन राममुक्त भाजप करायची बोंब ठोकली. पण हे तुम्हाला या जन्मात तरी शक्य होणार नाही. कारण तुम्ही मतांसाठी उबाठा गट हिरवा करून घेतला. छत्रपती शिवरायांचा वारसा सोडून तुम्ही औरंगजेबाच्या वारसदारांच्या पालख्या वाहत आहात”, असे ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले, हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, तुमच्या सारख्या औरंगजेबी वृत्तीला कशी धूळ चारायची हे इथल्या मावळ्यांना ठावूक आहे. आता तर शिवरायांची वाघनखंही महाराष्ट्रात आलीत, त्यामुळे यांचं वाघनखांच्या साक्षीनं येणाऱ्या निवडणुकीत मतांच्या शस्त्रानं जनता तुमचा हिरवा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!