“माझा पक्ष पळवला… माझा बाप पळवला… आता माझा भाऊ पळवला” ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात नुकतीच झालेली भेट राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. या भेटीनंतर राजकीय प्रतिक्रियांचा पाऊस पडत असताना शिंदे गटाच्या नेत्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता जोरदार निशाणा साधला आहे. शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी सोशल मीडियावर लिहिले, “काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more

प्रसाद ओक यांचा इतिहास : मराठी चित्रपटसृष्टीसाठी जागतिक मान्यता !

मुंबई : प्रतिनिधी मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता प्रसाद ओक यांनी इतिहास रचला आहे. त्यांच्या अभिनयाने २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या गाजलेल्या मराठी चित्रपट ‘धर्मवीर’ साठी मिळवलेल्या १५ पुरस्कारांच्या माध्यमातून एका प्रादेशिक भाषेतील चित्रपटासाठी सर्वाधिक पुरस्कार मिळवणाऱ्या अभिनेत्याच्या यादीत त्यांचे नाव इंग्लंडस्थित Global Book of Excellence संस्थेने अधिकृतपणे नोंदवले आहे. हा विक्रम १४ जानेवारी २०२६ रोजी अधिकृतपणे मान्य … Read more

रोहित पवारांच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी ; खा.सुळे !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर निर्माण झालेल्या शंका-कुशंकांना आता नवे वळण मिळाले आहे. अपघात की घातपात, या चर्चेमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणी आमदार रोहित पवार सातत्याने प्रश्न उपस्थित करत असून आता खासदार Supriya Sule यांनीही मौन सोडत पहिल्यांदाच स्पष्ट भूमिका मांडली आहे. गेल्या २८ जानेवारी रोजी … Read more

स्वराज्याच्या वारशाला जागतिक मान्यता ; मुख्यमंत्री फडणवीस !

जुन्नर : वृत्तसंस्था छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जन्मोत्सवानिमित्त शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ला येथे भव्य आणि उत्साहपूर्ण सोहळा पार पडला. राज्यभरातून आलेल्या शिवभक्तांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवरायांच्या कार्याचा गौरव करत स्वराज्याच्या संकल्पनेचा पुनरुच्चार केला. शिवजन्मभूमीवरून बोलताना फडणवीस यांनी इतिहास, स्वराज्य आणि किल्ल्यांच्या जतनाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. “छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास … Read more

शिवनेरी किल्लावर शिवजयंतीला गालबोट; चेंगराचेंगरी सदृश परिस्थितीत तिघे जखमी

पुणे : वृत्तसंस्था जिल्ह्यातील जुन्नर येथील शिवनेरी किल्ला येथे शिवजयंतीच्या सोहळ्याला आज गालबोट लागले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थानी दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो शिवभक्तांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला अपयश आल्याने गडावर चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती निर्माण झाली. या गोंधळात तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी … Read more

शिवनेरी किल्ला येथे शासकीय सोहळा; ढोल-ताशांच्या गजरात जन्मोत्सव साजरा !

पुणे : वृत्तसंस्था महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त राज्यभरात अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पहाटेपासूनच विविध ठिकाणी मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम आणि अभिषेक सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले. शिवजयंतीनिमित्त ऐतिहासिक शिवनेरी किल्ला येथे भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सुनेत्रा पवार यांनी शिवनेरी गडावर उपस्थित राहून … Read more

सरपंच देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; विजयसिंह बांगरच्या जबाबात धक्कादायक नावे !

बीड : वृत्तसंस्था जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड सध्या जेलमध्ये असून, त्याच्यावर परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येचा देखील आरोप आहे. आता या प्रकरणात एक नवा वळण समोर आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांचा 164 … Read more

मुस्लिम ‘एसबीसी’ आरक्षण रद्द: इम्तियाज जलील यांचे थेट आव्हान !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुस्लिम समुदायाला देण्यात आलेले ५ टक्के ‘एसबीसी’ (SBC) आरक्षण, त्यासंदर्भातील शासनादेश आणि परिपत्रक रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजात संताप व्यक्त होत असतानाच, माजी खासदार आणि इम्तियाज जलील यांनी समाजातील मौलानांवर अत्यंत बोचरी टीका करत त्यांना थेट रस्त्यावर उतरून … Read more

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम; प्रफुल पटेल यांची घोषणा !

मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना प्रफुल पटेल यांनी ठाम शब्दांत पूर्णविराम दिला आहे. “दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर कोणतीही चर्चा होणार नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी पक्षाच्या भविष्यातील नेतृत्वाबाबत महत्त्वाची घोषणा केली. येत्या २६ फेब्रुवारी रोजी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होईल, अशी माहिती … Read more

नंदनवनवरील ‘राज-शिंदे’ भेटीने राजकारणात खळबळ; नव्या समीकरणांची चाहूल?

मुंबई : वृत्तसंस्था राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी जाऊन घेतलेली भेट राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. अचानक ठरल्याचे सांगितल्या जाणाऱ्या या भेटीमागील नेमके कारण अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झाले नसले, तरी तिचे राजकीय परिणाम काय असू शकतात याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. नंदनवन बंगल्यावर झालेल्या या बैठकीत … Read more