तहसीलदार मुंडे लाच प्रकरणात अडचणीत; एसीबीची सापळा कारवाई, महसूल प्रशासनात खळबळ !

बीड : वृत्तसंस्था परळी येथील तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांचे नाव लाच प्रकरणात समोर आल्यानंतर महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. सालंसी (ऐपत) प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदाराकडून तब्बल ५० हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) कडे करण्यात आली होती. तक्रार दाखल होताच एसीबीने प्राथमिक पडताळणी करून नियोजनबद्ध सापळा रचत कारवाई केली. तक्रारीनुसार, सुरुवातीला … Read more

‘कधी कधी मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, तेव्हा AI मदत करते’ – राहुल गांधींना कोपरखळी”

नवी दिल्ली  : वृत्तसंस्था नवी दिल्ली येथे पार पडलेल्या ‘इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026’ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) भूमिकेबाबत सविस्तर भाष्य केले. त्यांनी हलक्या फुलक्या शब्दांत राजकीय विरोधकांवरही टीका केली, “कधी कधी मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, तेव्हा AI मदत करू शकते,” असे म्हणत विरोधकांना कोपरखळी लगावली. फडणवीस यांनी … Read more

सल्ले द्यायचे असतील तर भेटूच, राजकारण शोधायची गरज नाही ; राज ठाकरे संतापले !

मुंबई : वृत्तसंस्था मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ही भेट मुंबईसह विविध शहरांतील समस्यांवर चर्चा करण्यासाठी आयोजित होती. राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, सत्ताधाऱ्यांना काही चांगले सल्ले द्यायचे असतील, तर त्यांना भेटणे हे केवळ नैसर्गिक आहे आणि त्यात कुठेही राजकारण शोधण्याची गरज नाही. राज … Read more

धक्कादायक घटना: गादीत गुंडाळलेल्या अवस्थेत तरुणीचा मृतदेह सापडला !

छत्रपती  संभाजीनगर : वृत्तसंस्था छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज महानगर परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. घरगुती सामानासह एका कारमध्ये गादीत गुंडाळलेल्या अवस्थेत २० वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे सावत्र आई-वडीलांनी मृतदेह लपवण्याचा प्रयत्न यशस्वी केला नाही. स्थानिक सूत्रांनुसार, वाळूज परिसरातून घरातील सामानासह कारमध्ये गादी गुंडाळून नेली जात होती. पोलिसांना कारच्या हालचाली संशयास्पद वाटल्या … Read more

मनपात उलटफेर; भाजपच्या १० नगरसेवकांचा काँग्रेस–राष्ट्रवादी आघाडीत प्रवेश !

मुंबई : वृत्तसंस्था भिवंडी महापालिकेतील महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी २० फेब्रुवारीला होणाऱ्या मतदानापूर्वी राजकीय रंगभूमी तापली आहे. गेल्या बारा वर्षांत भाजपने अनेक नगरसेवक, नेते आणि माजी मंत्री फोडले, मात्र भिवंडी येथे उलटा प्रकार घडला आहे. भाजपच्या २२ नगरसेवकांपैकी १० ने काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सहकार्याने स्थापन केलेल्या भिवंडी सेक्युलर आघाडीत प्रवेश केला आहे. … Read more

एकल मातेलाच पूर्ण पालकत्वाचा दर्जा; खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था घटनात्मक मूल्ये आणि लिंगन्यायाच्या तत्त्वांना अधोरेखित करत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एकल महिलेलाही अपत्याची पूर्ण पालक म्हणून मान्यता देणारा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. बलात्कारपीडित एकल मातेला तिच्या मुलीचे नाव, आडनाव आणि जात तिच्या नावावर नोंदवण्याचा अधिकार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायमूर्ती विभा कंकणवाडी व न्यायमूर्ती हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठाने बीड … Read more

राज्यसभा–विधान परिषद जागांवरून मविआत खळबळ; ठाकरे गट–काँग्रेस आमनेसामने

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले असून महाविकास आघाडीत जागावाटपावरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. विधान परिषदेच्या एका जागेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आग्रही असताना, त्याच जागेसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भिन्न भूमिका घेतल्याने आघाडीत तणावाची चिन्हे दिसू लागली आहेत. १६ मार्च रोजी १० राज्यांतील ३७ राज्यसभा जागांसाठी निवडणूक … Read more

१० वी नंतरचं करिअर टेन्शन संपलं! कमी खर्चात, कमी कालावधीत नोकरी देणारे टॉप कोर्स !

  १० वीची बोर्ड परीक्षा पूर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थी आणि पालकांच्या मनात एकच प्रश्न असतो — आता पुढे काय? सर्वच विद्यार्थ्यांना दीर्घकालीन पदवी अभ्यासक्रम किंवा महागड्या कॉलेजचा खर्च परवडतोच असे नाही. मात्र याचा अर्थ असा नाही की त्यांच्या करिअरचे दरवाजे बंद होतात. आजच्या स्पर्धात्मक आणि कौशल्याधारित युगात १० वी नंतरही अनेक टेक्निकल आणि प्रोफेशनल कोर्स … Read more

‘विलीनीकरण झालंच नाही; आधीच पदवाटप?’ : रोहित पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांचा टोला

नाशिक : वृत्तसंस्था दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास संघटनेत मोठे बदल झाले असते, असा दावा आमदार रोहित पवार यांनी केल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या वक्तव्यानुसार, दिवंगत नेते अजित पवार यांना नेतृत्वात फेरबदल करायचे होते आणि प्रदेशाध्यक्षपदी तरुण चेहरा द्यायचा होता. त्या अनुषंगाने अमोल कोल्हे यांच्या नावाची चर्चा झाली होती, असा दावा त्यांनी … Read more

जरांगे पाटलांचा गंभीर आरोपाने धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार ?

मुंबई : वृत्तसंस्था मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एक गंभीर प्रकरण उघड झाल्याचा दावा केला. रंजना नागपूरकर या महिलेने केलेल्या आरोपांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, त्यांच्या पती प्रदीप नागपूरकर हे पोलिस दलात कार्यरत होते. एका प्रकरणाचा निकाल अनुकूल लावून देण्यासाठी धनंजय मुंडे यांना १७ लाख रुपये देण्यात आल्याचा आरोप … Read more