उच्च शिक्षणात गती; राज्यातील ५६१२ प्राध्यापकांच्या भरतीसाठी ‘या’ महिन्यात मोहीम

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी (२१ फेब्रुवारी) सांगितले की, राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील रिक्त असलेली ५०१२ सहायक प्राध्यापकांची आणि विद्यापीठांमधील ६० अशा एकूण ५६१२ पदांची भरती प्रक्रिया येत्या जूनमध्ये … Read more

पोलिस भरतीत धावताना 23 वर्षीय उमेदवाराचा मैदानावरच मृत्यू; देशसेवेचे स्वप्न अधुरे

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था  छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या पोलिस भरतीमध्ये एका 23 वर्षीय तरुणाचा धावण्याच्या चाचणीदरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. मृत उमेदवाराचे नाव संग्राम धोंडीराम शिंदे असून तो सांगली जिल्ह्याचा रहिवासी होता. देशसेवेच्या स्वप्नासह पोलिस होण्यासाठी आलेल्या संग्रामचा अकस्मात मृत्यू मैदानावरच झाला, ज्यामुळे भरती प्रक्रियेत सहभागी उमेदवारांमध्ये शोककळा पसरली. आज सकाळी सुमारे 8.15 वाजता शहरातील … Read more

आरएसएस वक्तव्य प्रकरणी राहुल गांधींची भिवंडी न्यायालयात हजेरी; नव्याने जामीन मंजूर

भिवंडी : वृत्तसंस्था  राहुल गांधी यांनी आज भिवंडी येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात हजेरी लावली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यावरून दाखल मानहानीच्या खटल्यातील न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ते उपस्थित होते. माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनामुळे आधीचा जामीन रद्द झाल्याने आज नव्याने जामीन प्रक्रिया पार पडली. या प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ … Read more

मालेगाव न्यायालयात राऊत–भुसे वादाचा शेवट; दिलगिरीनंतर मानहानीचा दावा मागे

मालेगाव : वृत्तसंस्था येथील न्यायालयात आज घडलेल्या घडामोडींनी राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना तोंड फोडले. मंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्याच्या सुनावणीसाठी खासदार संजय राऊत स्वतः न्यायालयात हजर राहिले. न्यायालयीन प्रक्रियेनंतर दोन्ही नेत्यांनी एकत्रितपणे माध्यमांसमोर येत वादावर पडदा टाकल्याची घोषणा केली. संजय राऊत यांनी न्यायालयात तसेच माध्यमांशी बोलताना स्पष्ट शब्दांत दिलगिरी व्यक्त केली. चुकीच्या … Read more

व्हीएसआरला ‘रेड कार्पेट’? रोहित पवारांचा मोदी-शहा यांच्याकडे धाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था रोहित पवार यांनी राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर गंभीर आरोप करत तेदेपा आणि व्हीएसआर विमान कंपनीमधील कथित आर्थिक संबंधांचा मुद्दा उपस्थित केला. या पार्श्वभूमीवर केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री राममोहन नायडू यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. रोहित पवार म्हणाले की, तेदेपा आणि व्हीएसआर कंपनीचे … Read more

मोठी बातमी : महिलांचा अंडाशय तस्करी रॅकेट उघडकीस; तीन महिलांना अटक

बदलापूर :  वृत्तसंस्था बदलापूरमध्ये गोरगरीब महिलांना पैशांच्या लोभात फसवून त्यांच्या अंडाशयांची बेकायदेशीर तस्करी केली जात असल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणानंतर बदलापूर पोलीस ठाणे यांनी रॅकेटमध्ये सहभागी तीन महिलांना ताब्यात घेतले असून, आणखी किती महिलांना याचा बळी पडला आहे, याचा तपास सुरू आहे. बदलापूरमधील एका पीडित महिलेनं उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर … Read more

बारावीचे फिजिक्स-केमिस्ट्री पेपर व्हॉट्सअ‍ॅपवर लीक !

नागपूर :  वृत्तसंस्था बारावी विज्ञान शाखेच्या फिजिक्स आणि केमिस्ट्री विषयांचे पेपर परीक्षेच्या तासाभरापूर्वीच व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये उघडकीस आली आहे. शहरातील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर हा प्रकार समोर आला असून, याप्रकरणी सदर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मार्फत बारावी (HSC) व … Read more

पहिली पत्नी जिवंत असतानाच बनावट मृत्यू दाखला; सोलापुरातील पतीचा असाही कारनामा !

लातूर : वृत्तसंस्था पहिली पत्नी जिवंत असतानाच तिचे बनावट मृत्यू प्रमाणपत्र काढून दुसरे लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार लातूर शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी सोलापूर येथील रहिवासी वैभव गोपीनाथ जाधव याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाणे येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर महानगरपालिका येथील जन्म-मृत्यू व विवाह नोंदणी विभागाचे निबंधक तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश … Read more

शक्तीपीठ महामार्गावरून परभणीत रणकंदन; पोलिसांचा तगडा बंदोबस्त

परभणी : वृत्तसंस्था मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधात परभणी जिल्ह्यातील सहजपूर जवळा येथे शेतकरी आक्रमक झाले आहेत. भूसंपादनाला विरोध करत शुक्रवारी शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. “आमच्या जमिनी घेण्यापेक्षा आम्हाला गोळ्या घाला” अशा संतप्त घोषणांनी परिसर दणाणून गेला असून, गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. सहजपूर जवळा गावाची लोकसंख्या सुमारे ३६५ इतकी … Read more

‘भारताचे सार्वभौमत्व धोक्यात’ ; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल!

मुंबई : वृत्तसंस्था राफेल लढाऊ विमान खरेदीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. भारताचे सार्वभौमत्व अमेरिकेला विकले गेले असल्याचा दावा करत, राष्ट्रीय सुरक्षेबाबत मोठा धोका निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारताने फ्रान्सकडून ११४ Rafale लढाऊ विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, त्यापैकी बहुतांश विमानांची निर्मिती … Read more