सर्व पक्षांनी सभागृहात सरकारला जाब विचारावा : रोहिणी खडसे !

मुंबई :  वृत्तसंस्था राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूभोवती निर्माण झालेल्या प्रश्नांची सखोल चौकशी होऊन सत्य समोर यावे, यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्व पक्षीय आमदारांनी सरकारला जाब विचारावा, अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे  यांनी केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक माध्यमावर संदेश प्रसिद्ध करत त्यांनी राज्यातील विविध गंभीर … Read more

वॉशरूमच्या दरवाजावर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो; राज्यात संतापाची लाट !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था हरियाणातील सिकरी येथील एका रिसॉर्टमध्ये वॉशरूमच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो लावल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. वाढत्या निषेधानंतर संबंधित रिसॉर्ट व्यवस्थापनाने छायाचित्रे काढून टाकली असून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. माहितीनुसार, हरियाणाच्या सिकरी येथील … Read more

“७० हजार कोटींच्या आरोपांनंतरही अजितदादा खचले नाहीत; कामातूनच दिले उत्तर” ; उद्धव ठाकरे !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात ठसा उमटवणारे नेते  अजित पवार यांच्या निधनानंतर विधानपरिषदेत शोकप्रस्तावावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी भावनिक शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली. “७० हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप झाले, पण अजितदादा कधीही खचले नाहीत. त्यांनी आरोपांना आपल्या कामातून उत्तर दिले. त्यामुळेच आरोप करणाऱ्यांनीही त्यांना सहकारी म्हणून स्वीकारले,” असे मत त्यांनी व्यक्त केले. विधानपरिषदेतील भाषणात ठाकरे … Read more

२२ वर्षीय महिलेने हातावर सुसाईड नोट लिहून संपविले आयुष्य : सोलापूर जिल्ह्यात खळबळ !

सोलापूर : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक ठिकाणी आयुष्य संपविल्याच्या घटना घडत असताना आता सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पार्लर व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःचे आयुष्य सावरण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका विवाहितेने कुटुंबीयांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. या विवाहितीने फलटण येथील महिला डॉक्टरसारखेच आपल्या हातावर सुसाईड नोट लिहून … Read more

अजित पवारांच्या विमान अपघातावर संशय; सरकारने मौन सोडावे – विजय वडेट्टीवार

मुंबई : वृत्त संस्था  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्या विमान अपघातातील मृत्यूबाबत सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय  वडेट्टीवार यांनी केली आहे. “हा केवळ अपघात आहे की त्यामागे काही घातपात दडलाय? देशभरात चर्चा सुरू असताना सरकार फक्त दोन ओळींच्या स्पष्टीकरणात बोळवण का करत आहे?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. उद्यापासून सुरू होणाऱ्या … Read more

शरद पवार यांची प्रकृती पुन्हा बिघडली, रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल

पुणे : वृत्तसंस्था  माजी उपमुख्यमंत्री शरद पवार यांची प्रकृती पुन्हा एकदा काहीशी बिघडल्याने त्यांना आज पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पवार कुटुंबासह संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला असून या कठीण काळात शरद पवार यांच्या शरीरातील पाण्याची पातळी घटल्यामुळे प्रचंड अशक्तपणा जाणवला. प्राथमिक माहितीनुसार, … Read more

शिवजयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना ग्रंथभेट : विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी आणि स्वराज्याचा अभिमान जागवणारा उपक्रम !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी तालुक्यातील हालहळ्ळी (अ.) येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ गोविंदे यांच्या कल्पकतेतून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विद्यार्थ्यांना ग्रंथभेट देत उत्साहात साजरी करण्यात आली. देशभक्ती, वाचनसंस्कृती आणि इतिहासाची जाणीव या त्रिसूत्रीवर आधारित हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रामसेविका सरवळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण … Read more

कलबुरगीच्या परिषदेची राज्यस्तरीय दखल; दोन लाखांचा ‘मंगेश पाडगावकर’ पुरस्कार जाहीर

कलबुरगी : प्रतिनिधी  कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद या संस्थेची महाराष्ट्र शासनाच्या प्रतिष्ठेच्या ‘मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार–२०२५’ (संस्था) साठी निवड करण्यात आली आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि महाराष्ट्राबाहेर मराठी भाषा व साहित्याचा प्रसार करण्यासाठी केलेल्या लक्षणीय कार्याची दखल घेत ही निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे दरवर्षी ज्येष्ठ कवी मंगेश … Read more

सोलापूर : साखरपुड्यानंतर चार दिवसांतच कार अपघातात नियोजित वर-वधूचा दुर्दैवी मृत्यू !

सोलापूर : वृत्तसंस्था सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सकाळी घडलेल्या भीषण कार अपघातात साखरपुड्यानंतर फक्त चार दिवसांनीच वाशी तालुक्यातील एका जोडप्याचे लग्नाचे स्वप्न अधुरे राहिले. मिळालेल्या माहितीनुसार,  वाशी तालुक्यातील पारा येथील नामदेव शिनगारे यांचा मुलगा अक्षय शिनगारे (२५) आणि इजोरा (हालमुक्काम वाशी) येथील सुनील चव्हाण यांची मुलगी अक्षया चव्हाण (२३) यांचा गत रविवारी (१५ फेब्रुवारी) साखरपुडा संपन्न … Read more

वडिलांच्या अंतिम क्षणीही परीक्षा दिली; सोलापूरची धनश्री पवार धाडसाची प्रतीक

सोलापूर : वृत्तसंस्था सोलापूर शहरात एक प्रेरणादायी घटना घडली आहे, जी मनाला चटका लावणारी आहे. दहावीच्या पहिल्या पेपरसाठी निघालेल्या धनश्री भिकाजी पवार या विद्यार्थिनीला ऐनवेळी आपल्या वडिलांचे निधन झाल्याची दुःखद बातमी समजली. तिच्या आयुष्याचा आधार हरपला, पण ती थांबली नाही; तिने आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या निर्धाराने परीक्षा केंद्र गाठून मराठीचा पहिला पेपर दिला. धनश्री … Read more