मराठा आरक्षणासाठी नवीन समिती स्थापन, जरांगे पाटलांचा सरकारला उपोषण इशारा !

मुंबई : वृत्तसंस्था मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत सरकारने विलंब केल्याने नाराजी व्यक्त करत, मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी जून महिन्यात पुन्हा उपोषणाचा इशारा दिला आहे. जर विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाले किंवा आरक्षणाचा लाभ मिळाला नाही, तर कोणत्याही विनंतीकडे सरकारकडून लक्ष दिले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी संबंधित मंत्र्यांकडे परिस्थितीची गांभीर्याने … Read more

देशाची राजधानी हादरली : पतीकडून पत्नी व तीन चिमुकल्यांची निर्घृण हत्या !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाची राजधानी दिल्ली येथे बुधवारी सकाळी घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. उत्तर-पश्चिम दिल्लीतील चंदन पार्क परिसरात एका तरुणाने धारदार चाकूने पत्नी आणि तीन लहान मुलींची निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलिसांनी त्याच्या शोधासाठी विशेष पथके तयार केली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी काही वर्षांपूर्वी रोजगाराच्या … Read more

‘मनपा विकासासाठी की नमाजासाठी?’ ; मदरसे बंद करण्याची मंत्री राणेंची मागणी

मालेगाव : वृत्तसंस्था राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी मालेगाव महापालिकेत नमाज पठणाच्या मुद्द्यावरून तीव्र टीका केली आहे. निवडणुकीपूर्वी काही पक्ष “जय भीम-जय मीम” म्हणतात; मात्र निवडणुकीनंतर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विसरतात, असा आरोप त्यांनी केला. तसेच, महापालिकेत नमाज पठणास परवानगी संविधानाच्या कुठल्या पानावर आहे, हे दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले. राणे म्हणाले की, लोकप्रतिनिधी … Read more

भाजप-काँग्रेस संघर्ष तीव्र; तुषार दामगुडे- हनुमंत पवार वाद मारहाणीपर्यंत पोहोचला

मुंबई : वृत्तसंस्था भाजपचे पदाधिकारी तुषार दामगुडे आणि काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार  यांच्यात सोमवारी झालेल्या वादाचा पडसाद मंगळवारी राजकीय वर्तुळात जाणवला. सोमवारी दोघेही एका मराठी वृत्तवाहिनीवर राजकीय चर्चासत्रात सहभागी झाले होते. परत येताना दामगुडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हनुमंत पवार यांना मारहाणी केली. दामगुडेंनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना आपल्याला या कृत्याचा कोणताही पश्चाताप नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी … Read more

रोहित पवार सुरू करणार ‘जनता दरबार’; अजित पवारांचा लोकसंपर्काचा वारसा कायम

मुंबई : वृत्तसंस्था दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाची शैली जपण्याचा निर्णय आमदार रोहित पवार यांनी घेतला आहे. विधानसभेत भावनिक क्षण अनुभवलेल्या रोहित पवार आता दर मंगळवारी ‘जनता दरबार’ आयोजित करून जनसामान्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. या उपक्रमाद्वारे ते सर्वसामान्यांबरोबरच पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या अडचणीही थेट समजून घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाचे अधिकृत … Read more

बारामतीत पोटनिवडणुकीची रणधुमाळी; सुनेत्रा पवार मैदानात, राष्ट्रवादीत मोठ्या राजकीय हालचाली

बारामती :  वृत्तसंस्था अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. निवडणूक आयोगाने या मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला असून १ जानेवारी २०२६ पर्यंत नाव नोंदविलेल्या मतदारांना मतदानाचा अधिकार असणार आहे. १० मार्च रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार असून त्यानंतर निवडणुकीची अधिकृत घोषणा … Read more

मराठा आरक्षणावर सरकारची मोठी कबुली : सहा महिन्यांनंतरही कुणबी प्रमाणपत्र वाटपास प्रशासकीय दिरंगाई !

मुंबई : वृत्तसंस्था मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत केलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू करून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सहा महिने उलटूनही प्रशासकीय स्तरावर कार्यपद्धती (SOP) अद्याप निश्चित झालेली नाही, अशी कबुली सरकारने २० फेब्रुवारी रोजी काढलेल्या आदेशातून दिली आहे. सरकारच्या या कबुलीमुळे प्रशासकीय यंत्रणेतील ढिसाळ … Read more

विरोधकांचा अर्थसंकल्पीय अधिवेशनात धारेवर: आदित्य ठाकरे सरकारला ठोकल्या मुद्द्यांवर प्रश्न !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना, विधानसभेत आणि विधानपरिषदेत मंगळवारी वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शोकप्रस्ताव मांडल्यानंतर अनेक नेते भावनिक झाले, मात्र नंतर विरोधकांनी सरकारवर विविध मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करून त्याला धारेवर धरले. आदित्य ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांची नावे वगळल्याचा गंभीर आरोप केला. तसेच मुंबईतील … Read more

दादांचा अपघात अपघात नाही, घातपात आहे” : रोहित पवारांचा धक्कादायक दावा VSR रेकॉर्डवर विवाद वाढवणार !

मुंबई : वृत्तसंस्था बारामती – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गत २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातानंतर आता प्रकरणाला नवे वळण लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि त्यांचे पुतणे रोहित पवार यांनी अपघातावर संशय व्यक्त करत म्हटले आहे की, “अजित दादांचा अपघात हा अपघात नसून घातपात आहे.” रोहित पवारांनी सोशल मीडियावर वाचकांसमोर धक्कादायक माहिती … Read more

“समृद्धीच्या नावाखाली ११५० कोटींचा महाघोटाळा?” ; अंबादास दानवे यांचा सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप

मुंबई : वृत्तसंस्था अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने तब्बल ११५० कोटी रुपयांचा महाघोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करत राज्यातील राजकारण ढवळून काढले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे आमदार असलेल्या दानवे यांनी या प्रकरणात सत्ताधारी पक्षाच्या एका बड्या खासदाराच्या कथित भूमिकेकडे अंगुलीनिर्देश केला आहे. मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या पोस्टमध्ये दानवे म्हणाले, “समृद्धीच्या नावाखाली ‘लुटालुटीचा’ महामार्ग उभारला … Read more