“भारत-अमेरिका करारातून सार्वभौमत्व धोक्यात” : अॅड. प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

नागपूर : वृत्तसंस्था भारत-अमेरिका करारामुळे देशाच्या आर्थिक आणि परराष्ट्र धोरणांवर दूरगामी परिणाम होणार असून, या माध्यमातून भारताचे सार्वभौमत्व धोक्यात आले आहे, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. ते नागपूर येथे माध्यमांशी बोलत होते. वंचित बहुजन आघाडी चे अध्यक्ष असलेल्या आंबेडकर यांनी केंद्रातील भारतीय जनता पक्ष सरकारवर निशाणा साधत, हा करार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मार्गदर्शनाखाली … Read more

लाडकी बहिणींना मोठा दिलासा : ‘या’ महिन्याच्या हफ्ता जमा होण्यास सुरुवात !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत जानेवारी महिन्याचा ₹1,500 चा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारपासून अनेक महिलांच्या मोबाईलवर बँक क्रेडिटचे संदेश येऊ लागले आहेत. महिला व बालविकास विभागानेही हप्त्याचे वितरण अधिकृतपणे सुरू झाल्याची माहिती दिली आहे. जानेवारीचा हप्ता देण्यासाठी सामाजिक … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस मुंबईत भव्य शोकसभा; नाना पाटेकर भावुक !

मुंबई : वृत्तसंस्था  28 जानेवारी रोजी विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली निधन झाल्याने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली होती. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी आजही पचवणं कठीण आहे. त्यांच्या स्मृतीसाठी मुंबईतील वरळी डोम येथे आज भव्य शोकसभेचे आयोजन करण्यात आले, ज्यात राजकीय नेते, दिग्गज उद्योगपती, कलाकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शोकसभेत … Read more

कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकने बसला दिली जबर धडक, चालकाचा मृत्यू !

पुणे : वृत्तसंस्था  मंगळवारी पहाटे सुमारे चार वाजता पुण्यातील कर्जत घाट परिसरात भीषण अपघात घडला. कात्रज बोगद्याकडून नवले पुलाच्या दिशेने जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. विशेषतः कर्जत न्यू टनेलपासून जांभुळवाडी दरी पुलादरम्यान ट्रकने समोरून येणाऱ्या बसला जोरात धडक दिली. प्राथमिक माहितीनुसार, लोखंडी पाईप आणि सळ्यांनी भरलेला ट्रक इतक्या वेगाने आला की धडक इतकी तीव्र … Read more

मुंढवा जमीन प्रकरणाला नवे वळण; दिग्विजय पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मागे !

पुणे : वृत्तसंस्था  पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल असलेले दिग्विजय पाटील यांनी पुणे सत्र न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला आहे. पोलिसांनी दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केल्यानंतर बदललेल्या परिस्थितीनुसार नव्याने अर्ज दाखल करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. त्यामुळे प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. गुन्हा नोंद … Read more

वरचे बटन उघडे राहणार, आठवणी सतत जागवतील – रोहित पवार

मुंबई : वृत्तसंस्था आज विधानसभेत अजित पवारांच्या शोकप्रस्तावावर बोलताना अनेक नेते भावूक झाले. या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांचाही समावेश होता. रोहित पवार यांनी आपल्या काक अजित पवारांच्या आठवणी सांगताना अश्रू अनावर झाले आणि सभागृहातील वातावरण भावनिक झाले. रोहित पवार म्हणाले की, अजितदादांनी नेहमी त्यांना शारीरिक आरोग्यावर लक्ष ठेवण्यास … Read more

मेळघाटात भीषण अपघात; पिकअप दरीत कोसळल्याने सात मजूरांचा मृत्यू

अमरावती :  वृत्तसंस्था अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील राणीघाट भागात बुधवारी सकाळी भीषण अपघात घडला. मजूरांना घेऊन जाणारे पिकअप वाहन सुमारे ५० फूट दरीत कोसळल्याने सात जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. स्थानिक प्रशासन आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल असून मदतकार्य सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, मजूरांना घेऊन जाणारे पिकअप वाहन घाटमाथ्यावरून उतरतेवेळी अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन … Read more

सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नवजात मुलगी आईविना; प्रसुतीनंतर महिला पलायन !

सोलापूर :  वृत्तसंस्था सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रसुतीनंतर अवघ्या पाच दिवसाच्या नवजात मुलीला आईने अचानक सोडून गेले, अशी धक्कादायक घटना घडली आहे. या मुलीवर सध्या रुग्णालयातील स्टाफ उपचार करत असून तिच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेत आहे. अक्कलकोटच्या शांती चौक येथील पाण्याच्या टाकीखाली राहून भीक मागून जगणारी छाया नागेश राऊळे ही महिला आठ महिन्यांची गरोदर होती. मंगळवार … Read more

विनापरवानगी पुतळा, २३ जण अटकेत; गावात तणावपूर्ण शांतता

बुलढाणा :  वृत्तसंस्था बुलढाणा जिल्ह्यातील चिखला काकड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनधिकृत पुतळा स्थापनेवरून निर्माण झालेला वाद गंभीर वळणावर पोहोचला आहे. गेल्या चार दिवसांपासून गावात तणावपूर्ण वातावरण असून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून प्रशासनाने कलम १६३ अंतर्गत संचारबंदी लागू केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी गावचे सरपंच गणेश काकड यांच्यासह एकूण २३ जणांना अटक केली असून … Read more

हायकोर्ट सिग्नलवर मद्यधुंद दांपत्याचा धिंगाणा; वाहतूक पोलिसाला कानशिलात !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था जालना रोडवरील हायकोर्ट सिग्नल परिसरात रविवारी (२२ फेब्रुवारी) सायंकाळी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाला मद्यधुंद दुचाकीस्वार आणि त्याच्या पत्नीने भररस्त्यात मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली. विशेष म्हणजे, मदतीसाठी वारंवार संदेश पाठवूनही पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी तब्बल एक तास लागला. या प्रकरणी सोमनाथ मुरलीधर गिरी (वय २७, रा. चांदननगर, ता. नेवासा) आणि त्याच्या पत्नीविरुद्ध … Read more