---Advertisement---

मनपात उलटफेर; भाजपच्या १० नगरसेवकांचा काँग्रेस–राष्ट्रवादी आघाडीत प्रवेश !

By team
On: February 20, 2026 10:37 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

भिवंडी महापालिकेतील महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी २० फेब्रुवारीला होणाऱ्या मतदानापूर्वी राजकीय रंगभूमी तापली आहे. गेल्या बारा वर्षांत भाजपने अनेक नगरसेवक, नेते आणि माजी मंत्री फोडले, मात्र भिवंडी येथे उलटा प्रकार घडला आहे. भाजपच्या २२ नगरसेवकांपैकी १० ने काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सहकार्याने स्थापन केलेल्या भिवंडी सेक्युलर आघाडीत प्रवेश केला आहे.

भिवंडी मनपाच्या ९० सदस्यांच्या सभागृहात सेक्युलर आघाडीला ५२ नगरसेवकांचा पाठिंबा मिळाल्यामुळे नारायण चौधरी महापौर होण्याची शक्यता वाढली आहे. भाजपने बंडखोरांना रोखण्यासाठी व्हीप जारी केला आहे, मात्र सध्या त्याचा परिणाम दिसत नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना या फाटाफूटीत मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याचा खुला कौतुक केले आहे.

भाजपने सुरुवातीला महापौरपदासाठी नारायण चौधरी यांची नावाची घोषणा केली होती, परंतु दोन दिवसांपूर्वी स्नेहा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे चौधरी व त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली. त्यांनी मुंबईतील टिळक भवनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची भेट घेऊन भिवंडी सेक्युलर आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी सेक्युलर आघाडी स्थापनेची रणनिती आखली. काँग्रेसचे ३०, राष्ट्रवादीचे १२, तसेच शिंदेसेना १२ आणि समाजवादी पक्षाचे ६ नगरसेवक यामुळे आघाडी ५२ पर्यंत पोहोचली. यामुळे महापौरपदासाठी आघाडीला आवश्यक असलेले किमान ४ नगरसेवक सहज उपलब्ध झाले आहेत. गेल्या दीड महिन्यात भाजपने अंबरनाथ येथे काँग्रेसचे ११, चंद्रपूर येथे उद्धवसेनेचे ६ आणि कल्याण-डोंबिवलीत मनसेचे ५ नगरसेवक फोडले होते. मात्र शिंदेसेनेने भाजपला बाजूला ठेवून समाजवादी पक्षासह तिसरी आघाडी स्थापन करून भिवंडीतील सत्तासंघर्ष नवे वळण घेतले आहे.

भिवंडीतील हा संघर्ष आगामी भाजप-शिंदेसेना राजकीय लढाईसाठी बीजे पेरणारा मानला जात आहे. तथापि, भाजपमधील काही वरिष्ठ नेते विरोधकांच्या पाठिंब्यावरचरी नगरसेवक महापौर होणे हे आपले यश मानत आहेत, असे राजकीय निरीक्षक सांगतात.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!