शिवसेनेचे आ.प्रताप सरनाईकांच्या घरावर ईडीची छापेमारी ; किरीट सोमय्या म्हणतात….

मुंबई : सक्तवसुली संचालनालयानं शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर छापे टाकताच भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांच्यावर हल्ला चढवला आहे. ‘शिवसेनेचे मोठे मोठे नेते आणि त्यांचे मुखिया व त्यांचा परिवार असेच उद्योगधंदे करतात हे सर्वांना माहीत आहे,’ असा थेट आरोप सोमय्या यांनी केला आहे. ‘प्रताप सरनाईक यांच्या … Read more

राज्यामध्ये एक वर्षापूर्वी पहाटे ‘लव्ह जिहाद’ झाला, शिवसेनेची भाजपवर टीका

मुंबई : ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याची मागणी करणाऱ्या भाजपवर शिवसेनेनं ‘सामना’च्या आजच्या अग्रलेखातून टीकेची झोड उठवली आहे. ‘लव्ह जिहाद’च्या विषयावर बांग देऊन सरकारला हादरे देऊ, या भ्रमातूनही भाजपवाल्यांनी बाहेर पडावे. एक वर्षापूर्वी पहाटे ‘लव्ह जिहाद’ झाला. तरीही महाविकास आघाडीचे सरकार आले व टिकले. ते टिकणारच आहे!, अशा शब्दात शिवसेनेन भाजपवर टीका केली आहे. राज्यात लव्ह जिहादवरून … Read more

राज्यातील ३५ टक्के शाळा भरल्या, मात्र अवघी पाच टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर अखेर सोमवारपासून राज्यातील नववी, दहावी आणि बारावीच्या शाळा सुरू झाल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव असतानादेखील शाळा सुरु करण्यात आल्या. पहिल्याच दिवशी राज्यातील काही जिल्ह्यांमधील सुमारे ३५ टक्के शाळा भरल्या. मात्र, त्यात विद्यार्थ्यांची उपस्थिती अवघी पाच टक्केच होती. सोमवारी राज्यातील काही जिल्ह्यांमधील सुमारे ३५ टक्के शाळांमध्ये सुमारे दोन लाख ९९ … Read more

मनोर येथे 200 एमएलडी नि:क्षारीकरण प्रकल्प उभारणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : मुंबईत मे व जून महिन्यातील पाणी कपात टाळण्यासाठी मनोर येथे समुद्राचे 200 एमएलडी खारे पाणी गोडे करणाऱ्या नि:क्षारीकरण प्रकल्प उभारणीचा आढावा घेऊन प्रकल्पाची पुढची प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी दिले. वर्षा या शासकीय निवासस्थानी 200 एमएलडी नि:क्षारीकरण प्रकल्प उभारणीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य … Read more

‘या’ राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी राज्य सरकारची नवी नियमावली जारी, जाणून घ्या काय आहे

मुंबई : दिवाळीनंतर राज्यात कोरोना संसर्गाचा वेग पुन्हा वाढला आहे. हिवाळ्यात हा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.  दिल्ली, गोवा, राजस्थान, गुजरात या राज्यांतून ट्रेन किंवा विमानानं येणाऱ्या प्रवाशांकडे कोरोनाचे चाचणीचे अहवाल असणं अनिवार्य असणार आहे. प्रवाशांनी केलेल्या आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल निगेटिव्ह असणं बंधनकारक आहे. ही टेस्ट … Read more

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की अजित पवार? -प्रकाश आंबेडकरांचा सवाल

मुंबई : सध्या राज्यात वाढीव वीजबिलांचा मुद्दा चांगलाच गाजतोय. काही दिवसांपूर्वी राज्याचे ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी वीजबिलात ग्राहकांना कोणतीही सवलत मिळणार नाही असं सांगितलं. त्यानंतर विरोधकांनी ठाकरे सरकारला चांगलेच धारेवर धरले. दरम्यान, याचं मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाविकासआघाडी सरकारवर टीका केली आहे. वीज बिल माफी संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय … Read more

…तर राज्यात पुन्हा निर्बंध लावणार, मुख्यमंत्र्यांचीही इच्छा ; आरोग्य मंत्री राजेश टोपेंची मोठी माहिती

जालना : दिवाळीनंतर देशात कोरोनाने पुन्हा एकदा आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. राज्यात कोरोनाची संख्या वाढत आहे. राज्यात सगळं पुन्हा सुरू झालं असलं तरी कोरोनाचा धोका कायम आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागू करणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली असून ही मुख्यमंत्री उद्धव … Read more

महापरिनिर्वाणदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना घरातूनच अभिवादन करा !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला समन्वय समिती, विविध यंत्रणाकडून आढावा मुंबई :- महापरिनिर्वाण दिन हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. या अभिवादनासाठी ज्या-ज्या गोष्टी करायच्या, त्या सर्व गोष्टी केल्या जातील. त्यामध्ये कुठेही कमीपणा येऊ देणार नाही. पण कोरोना संकटामुळे यावर्षी मात्र जनतेने अभिवादनासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर गर्दी करू नये. परिस्थितीचे भान ओळखून … Read more

“जे झालं ते झालं, पण आता.. ‘त्या’ पहाटेच्या शपथविधीवर फडणवीसांचं भाष्य

औरंगाबाद: संपूर्ण महाराष्ट्र साखर झोपेत असताना आजपासून बरोबर १ वर्षापूर्वी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. राजभवनात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी पार पडला.  देवेंद्र फडणवीस यांनी त्या शपथविधीवर आता भाष्य केले आहे. आता पहाटे शपविधी घेण्याची गरज पडणार नाही असे म्हटले आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारासंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस … Read more

पुणे विभागातील जिल्हाधिकाऱ्यांनी पदवीधर,शिक्षक मतदान-मतमोजणीची तयारी वेळेत पूर्ण करावी

पुणे : पुणे विभागातील जिल्हाधिकाऱ्यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान व मतमोजणीसाठीची सर्व तयारी वेळेत पूर्ण करावी,अशा सूचना विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ राव यांनी दिल्या. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी विभागीय आयुक्त कार्यालयातून आज विभागातील पाचही जिल्ह्यांच्या निवडणूक विषयक कामकाजाचा व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे आढावा घेतला.  यावेळी जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक … Read more