ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सावधान : नूडल्स खाल्याने होवू शकतात गंभीर आजार !

सध्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना फास्ट फूड खाण्याची सवय लागली आहे. त्यामुळे दोन मिनिटांत इन्स्टंट नूडल्स बनवण्याची आवड आणि ट्रेंडही वाढत आहे. हल्ली पालक देखील मुलांना नूडल्स खायला आवडते म्हणून टिफिन बॉक्समध्ये किंवा भूक लागल्यावर नूडल्स खाऊ घालतात. नूडल्स हे सहज आणि सोप्या पद्धतीने बनवता येणारा पदार्थ आहे. हा पदार्थ मैदा, स्टार्च, पाणी, मीठ या घटकांपासून तयार केला जातो. यामध्ये मसाला, मीठ आणि मोनोसोडियम ग्लूटामेट सारख्या फ्लेवरिंग पॅकेटही यामध्ये दिले जाते.

अनेक भाज्या आणि विविध मसाले टाकून याची चव आणखी टेस्टी केली जाते. साधा नूडल्सपासून ते हक्का नुडल्सपर्यंत विविध प्रकार बनवून याची चव चाखली जाते. नुडल्स खाल्ल्यामुळे मुलांचे पोट भरते, अनेकांना आनंदही होतो. जिभेचे चोचले पुरवणारा हा पदार्थ आरोग्यासाठी अतिशय हानिकारक ठरतो. जाणून घेऊया याचे दुष्परिणाम

1. नूडल्स कसे बनवले जातात?
नूडल्स हे मैदा, पाणी आणि मीठ यापासून बनवले जाते. हे नूडल्स लवचिक आणि चिकट असतात. यूएस डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चरनुसार, नूडल्सच्या एका पॅकेटमध्ये 14 ग्रॅम फॅट्स आणि 6.58 ग्रॅम सॅच्युरेटेड फॅट्स असतात.

2. नूडल्स खाल्ल्याने आरोग्यावर कसा होतो परिणाम?
नूडल्समध्ये फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिने यांचे प्रमाण खूप कमी असते. हे खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. पण यात असणारे पोषक तत्व कमी असतात आणि कॅलरीज अधिक असतात. ज्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

3. अधिक सोडियम
100 ग्रॅम नूडल्समध्ये 397-3678 मिलीग्राम सोडियम असते. अधिक प्रमाणात याचे सेवन केल्याने पोटाचा कर्करोग , हृदयविकार , उच्च रक्तदाब, किडनीचे आजार आणि पक्षाघाताचा धोकाही वाढतो.

4. फायबर आणि प्रोटिनची कमतरता
नूडल्समध्ये फायबर आणि प्रोटनीचे प्रमाण खूपच कमी असते. त्यामुळे वजन अधिक वाढते. यामुळे पचनक्रियेवर देखील परिणाम होतो.

5. नूडल्समुळे बळवतात हे आजार
प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये एमएसजीचा वापर केला जातो. याचे सतत सेवन केल्याने डोकेदुखी, उच्च रक्तदाब, अशक्तपणा, स्नायू कडक होणे, छातीत दुखणे, हृदयाचे ठोके वाढणे तसेच लठ्ठपणा आणि रक्तदाब वाढतो.

6. मेटाबॉलिक सिंड्रोम वाढते
आठवड्यातून एकापेक्षा जास्त वेळा ते खाल्ल्याने मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका वाढतो. सॅच्युरेटेड फॅट्सच्या अतिसेवनामुळे महिलांमध्ये उच्च रक्तदाब, उच्च साखरेची पातळी आणि मधुमेहाचा धोका वाढतो.

7. यकृताला पोहोचू शकते नुकसान
नूडल्स खाल्ल्याने पेशींमध्ये अतिरिक्त चरबी साठवू शकते. नूडल्ससारख्या प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्याने यकृतावर परिणाम होऊन सूज ही येते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!