---Advertisement---

संजय राऊतांची थेट श्रीकांत शिंदेंवर टीकास्त्र

By team
On: April 4, 2024 4:29 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांची जवळपास यादी जाहीर केली असून विरोधक व सत्ताधारी यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. यात ठाकरे गटाने देखील शिंदे गटावर टीकास्त्र सोडले आहे.

श्रीकांत शिंदे अद्याप बच्चा आहे. बच्चाजीमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर करावी, अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. आम्ही नारायण राणे यांचा देखील पराभव केला आहे. अनेक मोठमोठे लोक महाराष्ट्रात पडले आहेत. श्रीकांत शिंदे यांचा पराभव देखील वैशाली दरेकर या करतील, असे म्हणत संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. श्रीकांत शिंदे यांना कल्याण- डोंबिवली मध्ये खासदारकी ही उद्धव ठाकरे यांच्यामुळेच मिळाली आहे, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मात्र, आता तुमच्या युतीने अद्याप तुमची उमेदवारी जाहीर केली नसल्याचे ते म्हणाले. एक सर्वसामान्य शिवसैनिकच तुमचा पराभव करेल, असे म्हणत त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

माध्यमांशी संवाद साधताना खासदार संजय राऊत यांनी संजय निरुपम यांच्यावरही हल्ला चढवला. संजय निरुपम यांची अकालपट्टी करण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. हा त्यांचा पक्षांतर्गत निर्णय असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. प्रत्येक पक्षामध्ये अशा प्रकारची कारवाई होत असते. शिवसेनेत देखील अशा प्रकारची कारवाई होते, असे देखील खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. मुंबईमध्ये शिवसेना आणि महाविकास आघाडीमधील कोणताही बंडखोर आणि गद्दार टिकणार नसल्याचा दावा देखील खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!