नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढा झाली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयने आज पुन्हा एकदा छापे टाकले आहेत. आज सकाळी सीबीआयचे एक पथक दाखल त्यांच्या नागपुरातील निवासस्थानी दाखल झाले. यामध्ये सहा अधिकारी असून एक महिला अधिकाऱ्याचा समावेश आहे. ईडी, सिबीआय, आयकर विभाग आणि विविध यंत्रणांच्या माध्यमातून कारवाई सुरू झाल्यापासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय अज्ञातवासात गेले आहेत.
तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप लावले होते. या पत्रात अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना मुंबईतील बार, पब आणि रेस्टॉरंटमधून शंभर कोटी रुपये महिन्याला वसूल करण्याचे टार्गेट दिले असल्याचे लिहिले होते. या लेटर बॉम्बमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. तेंव्हापासून अनिल देशमुख हे ईडीच्या रडावर आहे. दरम्यान, यापूर्वीही ईडीने अनिल देशमुखांच्या घरी छापा टाकला होता.
काही दिवसांपूर्वी देखील आयकर विभागाने देखील छापे टाकून कागदपत्रांची पडताळणी केली होती. त्याआधी ईडीने सुद्धा देशमुख यांच्या नागपूर, काटोल आणि मुंबई येथील निवासस्थानी धाडी टाकल्या होत्या. देशमुख यांच्या निवासस्थानी कुटुंबातील कुणीही नाही. गेल्या काही महिन्यांपासून अनिल देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय अज्ञातवासात गेले आहेत. त्यांचा कुणाशी संपर्क नसल्याने आता सीबीआयचं पथक जेव्हा त्यांच्या घरी दाखल झालेलं आहे. त्यावेळी घरात मात्र कुटुंबातील कुणीही उपस्थित नसल्याचं पुढे आले आहे.