मारुती बावडे
अक्कलकोट,दि.३ : अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव (दे) येथे ग्रामपंचायतीच्यावतीने चौकाचौकांमध्ये सीसीटीव्ही बसवून गावाचे चित्र बदलले आहे.यामुळे स्मार्ट व्हिलेजची संकल्पना यशस्वी झाली असून या गावात विकास कामेही अनेक झाली आहेत.सीसीटीव्हीचा लोकार्पण सोहळा पोलीस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी यांच्या हस्ते करण्यात आला.एक सरपंच काय करू शकतो हे
गावात कार्य पाहिल्यानंतर लक्षात येते. शासनाच्या सर्व योजना राबवून विकासकामे करताना गावातील प्रमुख चौकांमध्ये सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसवून गाव डिजिटल करणाऱ्या बोरगाव ग्रामपंचायतीचा आदर्श तालुक्यातील नवनियुक्त सरपंचानी घ्यावा, असे आवाहन उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कलाप्पा पुजारी यांनी केले आहे.
कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी सरपंच विलास सुरवसे हे होते. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिध्दे, उपसरपंच राजेभाई मुजावर, पोलीस हवालदार अंगद गीते, विपीन सुरवसे, माणिक बिराजदार आदी उपस्थित होते. प्रारंभी प्रा. प्रकाश सुरवसे यांनी ग्रामपंचायतीच्यावतीने मागील तीन वर्षात झालेल्या आणि सध्या कार्यरत असलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली.पुढे बोलताना पुजारी म्हणाले, सी. सी. टी. व्ही.यंत्रणेमुळे पोलीस प्रशासनाला मोठी मदत होणार आहे. यामुळे गावाला डिजिटल स्वरूप प्राप्त होणार असल्याचे सांगितले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष दिलीप सिध्दे म्हणाले, सरपंच सुरवसे यांनी मागील तीन वर्षात विकासकामाचा डोंगर उभा केला आहे. गावच्या भल्यासाठी तळमळीने धडपडणारा सरपंच म्हणून तालुक्यात त्यांना मान्यता मिळत असून यापुढेही त्यांच्या विकासमय वाटचालीस सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.यावेळी ग्रामविकास अधिकारी लक्ष्मण भैरामडगी, वाहिद वळसंगकर, विजयकुमार खोबरे, अनिल दूधभाते, पोलीस पाटील अभिजित पाटील, इब्राहिम कारंजे, स्वरांजली बिराजदार, सुलोचना गवी, शैदुनिस्सा जमादार, अनामिका देशेट्टी, ग्रामपंचायत सदस्य राजेभाई बागवान, महेश हत्तरके, महंमद पठाण, श्रीकृष्ण मगर, नवाज खडकाळे, माणिक बिराजदार, सुभाष धनशेट्टी, अल्लाउददीन गवंडी, भीमशा हत्तरके, सुभाष पवार, अमीन मुजावर, गुंडू बागवान, योगीराज सिध्दे, सुनील सुरवसे, सचिन जिरगे, भागेश जिरंगे, विठ्ठल कोळी, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
अनेक कामे
प्रगतीपथावर
पाणीपुरवठा योजना – रु. १ कोटी
जि. प. शाळा क्रिडांगण सुशोभीकरण, स्टेज, गेट, कंपाउंड, स्वच्छतागृह – रु. ७ लाख,भूमिगत गटार – रु. २ लाख,
अनुसूचित जाती समाजमंदिर दुरुस्ती –
रु. २.५० लाख,अनुसूचित जाती वस्तीत सार्वजनिक महिला स्वच्छतागृह – रु. २ लाख अशी कामे सध्या सुरू आहेत.
विलास सुरवसे,सरपंच