ध्यास विश्वसार्ह बातमीचा

चपळगाव ग्रामपंचायतीने दिला दिव्यांगांना न्याय ; उपयोगी वस्तू भेट देऊन निर्माण केला रोजगार

अक्कलकोट, दि.१७ : समाजात अपंग हा घटक नेहमी दुर्लक्षित राहतो या भावनेतूनच चपळगाव ग्रामपंचायतीने त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे बळ देत ग्रामपंचायत निधीतून दिव्यांगांना उपयोगी वस्तू भेट देऊन त्यांना जगण्यासाठी पंख दिले आहेत. त्यांच्या या निर्णयाचे दिव्यांग बांधवांनी स्वागत केले आहे. तालुक्यात काही ग्रामपंचायतीने थेट रोख रक्कम देऊन या योजनेची अंमलबजावणी केली आहे परंतु चपळगाव ग्रामपंचायतने तसे न करता त्यांना थेट वस्तू देऊन त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी ताकद दिली आहे जेणेकरून या उपक्रमातून त्यांना रोजगार मिळू शकेल. शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते या वस्तूचे वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना कल्याणशेट्टी म्हणाले, समाजाच्या जडणघडणीसाठी प्रत्येकाचा सहभाग मोलाचा ठरतो.प्रत्येकजण आपापल्या
परीने योगदान देण्याचा प्रयत्न करतो. यास दिव्यांग,अपंग हे देखील अपवाद ठरले नाहीत. म्हणूनच समाजाची व्याख्या दिव्यांगांशिवाय अपूर्ण ठरते, असेही ते म्हणाले. ग्रामपंचायतीकडून मिळकत कराच्या पाच टक्के रक्कम आम्ही खास दिव्यांगांसाठी खर्च केला आहे. पैसे दिले तर कुठे तर खर्च होतात म्ह्णून या निधीतून आठ लाभार्थ्यांना शिलाई मशीन व
ळण्याची चक्की देण्यात आल्याचे सरपंच उमेश पाटील यांनी सांगितले.

गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी चपळगाव ग्रामपंचायतीने राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक करत इतर ग्रामपंचायतीने
याच्यातून अनुकरण करावे, असे आवाहन केले. बसवराज बाणेगाव म्हणाले, आमदार कल्याणशेट्टी यांनी चपळगावसाठी भरघोस निधी दिला आहे. त्यांच्या निधीतून अनेक विकास कामे गावामध्ये सुरू आहेत. चपळगाव व बावकरवाडी येथील
समर्थ बावकर, निर्मला खैराटे, काशिनाथ रामपुरे, कलावती अडवितोटे, पार्वती मोरे, आदिती कोरे, महेश बंडगर, आदर्श दुबे या लाभार्थ्यांना साहित्य देण्यात आले.

यावेळी विस्तार अधिकारी एस. बी. कोळी, ग्रामसेवक हुमनाबादकर, अंबणप्पा भंगे, बसवराज बाणेगांव, अंकुश चौगुले, प्रदीप पाटील, मनोज इंगुले, परमेश्वर वाले, श्रावण गजधाने, गणेश कोळी, मल्लिनाथ सोनार, महिबुब तांबोळी, प्रदीप वाले, राजा कोळी, सिध्दाराम भंगे, प्रकाश बुगडे, विष्णुवर्धन कांबळे, उमेश सोनार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर जगताप यांनी केले तर आभार सुरेश सुरवसे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!