---Advertisement---

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्यात तगडा बंदोबस्त, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी केली पाहणी

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.१७ : अक्कलकोट तालुक्यातील २० ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने अक्कलकोट तालुक्यात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सलगर गावाला अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, पोलीस उपअधीक्षक राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी भेट देत पाहणी केली.

अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे हद्दीतील १५ गावे, दक्षिण पोलीस ठाणे हद्दीतील ५ गावे आणि वळसंग पोलीस ठाणे हद्दीतील ६ गावे अशा एकुण २६ ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांनी सलगर आणि हत्तीकणबस या गावाला भेट दिली.

बंदोबस्तासाठी ११ पोलिस अधिकारी, १२५ पोलीस अंमलदार,८८ होमगार्ड, एक स्ट्राय किंग असा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. उपद्रवी लोकांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली असून या अंतर्गत ४७ लोकांना तडीपार करण्यात आले आहे, अशी माहिती गोपनीय शाखेने दिली

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!