ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई : धेय वेडेच इतिहास घडवतात, ‘वेडात मराठे वीर दौडले सात‘ या आगामी चित्रपटात धेय आणि ते गाठण्यासाठीचे वेड देखील आहेत्यामुळे हा चित्रपट सातासमुद्रापार जाईलअसा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. राज्य शासन कलाकारांच्या पाठीशी असून उत्तन जवळ नवीन चित्रनगरी बनविण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. 

महेश मांजरेकर दिग्दर्शित वेडात मराठे वीर दौडले सात‘ या चित्रपटाचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आज झाला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेचित्रपटाचे निर्माते वसीम कुरेशीउद्योग मंत्री उदय सामंतआमदार प्रताप सरनाईक आदी उपस्थित होते.

शिवाजी महाराजांनी गड – किल्ल्यांची केलेली बांधणीउंचावरील तोफागडावरील पाणीसाठा हे काम दूरदृष्टीचे होते. हे वैभव पाहून रयतेचा राजा नजरेसमोर येतो. त्यांच्यावरील सर्वच चित्रपटांना मोठा प्रतिसाद लाभला आहे. या चित्रपटाला देखील रसिकांचा प्रतिसाद मिळेलअसा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी चित्रपट कात टाकतोय असे सांगून हा चित्रपट देखील भव्य बनेलअसा विश्वास व्यक्त केला.

यावेळी जिवाजी पाटील यांची भूमिका साकारणारे विराज मडकेतुळजा जामकर यांची भूमिका साकारणारे जय बुधानेहार्दिक जोशीउत्कर्ष शिंदेविशाल निकमसत्यम मांजरेकर आणि प्रतापराव गुजर यांची भूमिका साकारणारे प्रवीण तरडे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चित्रपटात वापरण्यात येणारी शस्त्रे प्रदान करण्यात आली. या चित्रपटात शिवाजी महाराज यांची भूमिका अक्षय कुमार साकारणार आहेत.

डिसेंबर मध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार असून सन 2023 मध्ये दिवाळीत प्रदर्शित होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!