मुंबई : प्रतिनिधी
पंढरपूर आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक दिंडीला २० हजार रुपयांचे अनुदान देण्यात – येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केली. तसेच वारकऱ्यांना अपघात गटविमा आणि त्यांच्या वाहनांना मागील वर्षाप्रमाणे यंदाही टोल माफी देण्यात येणार असल्याचेही शिंदे यांनी जाहीर केले.
पंढरपूर तीर्थक्षेत्र आषाढी एकादशी वारी पालखी सोहळा पूर्व नियोजनासाठी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत सह्याद्री राज्य अथितीगृह येथे विशेष बैठक पार पडली. यंदाची आषाढी वारी स्वच्छ, निर्मल आणि सुरक्षित व्हावी, यासाठी शासन सर्वतोपरी नियोजन करत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.