मुंबई : वृत्तसंस्था
लोकसभेच्या प्रचार सभेदरम्यान ठाकरे गटाच्या महिला नेत्या सुषमा अंधारे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडल्यानंतर राज्यातील मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असून आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी अप्रत्यक्ष ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंवर टीकास्त्र डागले आहे.
चित्रा वाघ म्हणाले कि, राज ठाकरे यांचे कर्तुत्व मोठे आहे आणि त्यांच्यावर बोलणारे सटरफटर यांना फारसे महत्त्व देऊ नये, यांचे योगदान काय आहे, हे आपण पाहिले पाहिजे, जे व्हिडिओ दाखवले ते व्हिडिओ सत्य आहेत, त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केला. तर ठाकरे गटाच्या नेत्यांना किती गांभीर्याने घायचे हे ठरवले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हा माझा अजिबात विषय नाही. पण अडचण काय झाली, त्यांना जी सुपारी मिळाली होती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पहिली सुपारी माझ्या नावाची होती. महायुतीने माझा धसका घेतलाय. राज ठाकरे माझं कधीही टार्गेट नव्हते, असे सुषमा अंधारे म्हणाले. मी त्यांना मानतही नाही त्यांना माझ्यावर बोलले म्हणून माझा हिसका दाखवला. मी त्यांच्यावर बोलतही नाही. माझे टार्गेट हे इथले कळसूत्री बाहुल्या हलवणारे फडणवीस आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.
सुषमा अंधारे या प्रोफेशनल पॉलिटिक्स करणाऱ्या आहेत. सुपारी घेऊन उबाठा गटाचं बीड जिल्हाप्रमुखपद कुणाला दिले हे लोकांना माहिती आहे. बीड जिल्ह्यात सुपारी घेऊन टिका करणारी कोण हे सगळ्यांना माहिती आहे. आधी दलित चळवळीची सुपारी घेतली, त्यानंतर राष्ट्रवादीची सुपारी घेतली. त्यानंतर आता उबाठाची सुपारी घेतली. घे बोकांडी कर दहिहंडी असं बोलणाऱ्या याच सुषमा अंधारे आहेत. प्रभू श्री रामांबाबत, हनुमानाबाबत, संत ज्ञानेश्वर, एकनाथ महाराजांबाबत वाट्टेल त्या पातळीवर अंधारेंनीच भाषा केली असा घणाघात करत होय आम्ही सुपारी घेतली हिंदुत्वाची, महाराष्ट्राच्या हिताची असा पलटवार मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केला आहे.