नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून छत्तीसगडमध्ये सुरु असलेल्या चकमकीत पुन्हा एकदा गंगालूरमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चमकमकीत ८ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे. गंगालूरमध्ये नक्षली दबा धरून बसल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी ही कारवाई केली. गंगालूरमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये सकाळपासून चकमक सुरू होती. यामध्ये ८ नक्षलवादी ठार झाले आहेत.
डीआरजी, एसटीएफ, कोबरा, सीआरपीएफ 222 यांची संयुक्त टीम नक्षलविरोधी अभियान राबवित असताना ही चकमक झाली. सदर क्षेत्रात नक्षल दबा धरून बसले असल्याची माहिती मिळाली होती. ज्वाइंट ऑपरेशनने सकाळ पासूनच पोलीस आणि नक्षल यांच्यात चकमक सुरु होती. यामध्ये 8 नक्षली मारले गेले व अन्य सामग्री हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.