ध्यास विश्वसार्ह बातमीचा

गडचिरोली पोलिसांच्या सी-60 जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; नक्षलवाद्यांच्या एका मोठ्या नेत्यासह तब्बल “ईतके” नक्षलवादीठार झाल्याची माहिती

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील ग्यारापत्ती-कोटगुल जंगल परिसरात शनिवारी गडचिरोली पोलिसांच्या सी-60 जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत नक्षलवाद्यांच्या एका मोठ्या नेत्यासह 26 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली आहे. या चकमकीत चार पोलीस जखमी झाले आहेत. घटनास्थळावरून मोठा शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला आहे.

नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या महिन्यातच उच्च स्तरीय बैठक घेतली होती. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, एनएसए अजित डोभाल आणि नक्षलग्रस्त राज्यांचे मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक या बैठकीला उपस्थित होते. यावेळी शहा यांनी नक्षलग्रस्त भागात तैनात असलेल्या आयटीबीपी आणि सीआयएसएफसारख्या इतर निमलष्करी दलांनाही नक्षलवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास आणि कारवाई करण्यास सांगितले होते.

दक्षिण गडचिरोलीमध्ये कोरपर्शीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक झाली. हा भाग महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर येतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सी-60 जवान काही गावांमध्ये शोध मोहीम राबवत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलवादी आल्याची माहिती मिळाली होती. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!