ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सचिन वझे ओसामा बिन लादेन असल्यासारखं वागवलं जातंय – मुख्यमंत्री

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्या नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसुख हिरेन प्रकरणावरून प्रतिक्रिया दिली. सचिन वाझे ओसामा बिन लादेन असल्याचं चित्र निर्माण केलं जात आहे असे विरोधकांना टोला लगावला. आधी फाशी द्या आणि तपास करा असं होत नाही. हे प्रकरण सरकारने गांर्भियाने घेतलं आहे. तपास सुरु आहे, जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मृत्यू झाल्यानंतर सरकारचे काम आहे, त्यामुळे मोहन डेलकर यांनी देखील आत्महत्या केल्यानंतर काही जणांची नावे समोर आली आहेत. तपासाला दिशा देण्याचे काम करू नये. टार्गेट करून तपास करा असं होतं नाही, आधी तपास झाला पाहिजे. हिरेन यांच्या मृत्यूची आम्ही दाखल घेतली आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. यापत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यासमवेत उपमुख्यमंत्री अजीत पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, एकनाथ शिंदे, अनिल परब उपस्थीत होते.

◆ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

★ सचिन वझे हे ओसामा बिन लादेन असल्यासारखं वागवलं जातंय.

★ तपास आधी झाला पाहिजे.

★ अधिवेशन कोरोनामुळे आव्हानात्मक होत नियम पाळून अधिवेशन घेतलं.

★ कोणतही रडगाणं न गाता, जनतेला दिलासा देणारा अर्थसंकल्प आहे.

◆ अजित पवार यांचे मुद्दे –

★ अधिवेशन 10 दिवसाचे होते, ऊर्जामंत्री बाहेर जाते वीज तोडणीला स्थगिती दिली.

★ महावितरण कंपनीवर बोजा वाढत चालला आहे, 30 हजार कोटींची माफी दिली आहे.

★ आज नाईलाजास्तव निर्णय घ्यावा लागला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!