माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रातील दावे खोटे

नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा दिल्लीतील निवास्थानी पत्रकार परिषद घेऊन मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रातील दावे खोटे ठरवले आहे. गृहमंत्री फेब्रुवारीच्या महिन्यात कोरोनामुळे रुग्णालय आणि नंतर होम आयसोलेशनमध्ये होते. मग देशमुखांनी सचिन वाझेंना बोलावून वसुलीचे आदेश दिले असे परमबीर सिंग कशाच्या आधारावर म्हणतात? असा सवाल शरद … Read more

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची सुप्रीम कोर्टात धाव

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.यामुळे राज्यातील राजकीयात गोंधळ निर्माण झाली आहे.परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी याचिकेत केली आहे. माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ईमेल लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले होते. राज्याचे गृहमंत्री … Read more

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा तूर्तास नाही – नवाब मलिक

मुंबई : मुंबईचे माजी आयुक्त परमवीरसिंग यांच्या चिठ्ठीवर जो वाद निर्माण झाला आहे त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज प्रतिक्रिया दिली. गृहमंत्री अनिल देशमुख कोरोना पॉझिटिव्ह असताना त्यांना भेटल्याचा आरोप करणारे माजी आयुक्त परमवीर सिंग यांनी कटकारस्थान करुन महाविकास आघाडीला आणि गृहमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे असे ते … Read more

परम बीर सिंग यांच्या स्वाक्षरी नसलेल्या ईमेल पत्राबाबत शहानिशा

मुंबई दि २० : गृहरक्षक दलाचे कमांडट जनरल परम बीर सिंग यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत इमेलवर आज दुपारी 4.37 वाजता पत्र प्राप्त झाले आहे. [email protected] या ईमेल पत्त्यावरून परम बीर सिंग असे केवळ नाव लिहिलेले व स्वाक्षरी नसलेल्या या पत्राचा ईमेल पत्ता तपासून घेण्यात येत आहे, त्याचप्रमाणे परम बीर सिंग यांना गृहविभागामार्फत संपर्क साधण्याचा … Read more

सचिन वझे ओसामा बिन लादेन असल्यासारखं वागवलं जातंय – मुख्यमंत्री

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्या नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसुख हिरेन प्रकरणावरून प्रतिक्रिया दिली. सचिन वाझे ओसामा बिन लादेन असल्याचं चित्र निर्माण केलं जात आहे असे विरोधकांना टोला लगावला. आधी फाशी द्या आणि तपास करा असं होत नाही. हे प्रकरण सरकारने गांर्भियाने घेतलं आहे. … Read more

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल- गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती रिलायन्स समुहाचे मालक मुकेश अंबानी यांच्या बंगल्यासमोर आढळलेल्या स्कॉरपियोचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत स्पष्टीकरण दिले आहे. मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचा संशय त्यांच्या पत्नीने व्यक्त केला होता. त्यानुसार हत्येचा गुन्हा दाखल केल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत दिली. उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराजवळ सापडलेली … Read more

‘अँटिलिया’ समोर स्फोटक पदार्थ असलेली चारचाकी सापडल्याच्या प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडून – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई, दि. 5 : मुकेश  अंबानी  यांच्या  ‘अँटिलिया’  निवासस्थानाजवळ स्फोटक पदार्थांसह सापडलेल्या गाडीच्या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवण्यात येत असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत केली. तत्पूर्वी गृहमंत्री श्री.देशमुख म्हणाले, मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाजवळ स्फोटक पदार्थ सापडलेली स्कॉर्पिओ गाडी मनसुख हिरेन यांच्या ताब्यात होती. ही गाडी सॅम पीटर न्यूटन यांच्या मालकीची होती. … Read more

दबावाचा प्रश्नच नाही, मंत्री राठोड यांची चौकशी होणार

मुंबई: बीड जिल्ह्यातील परळी येथील रहिवासी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापले आहे. आत्महत्या प्रकरणाशी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव जोडले गेले आहे. त्यांच्यावर कारवाईची मागणी भाजपसह विरोधकांनी केला आहे. सोमवारी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ‘कुणाच्या दबावाचा प्रश्नच नाही, संजय राठोडबाबत नियमानुसार चौकशी होणार, सत्य बाहेर येणार. चौकशीत जे … Read more