ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पोलीस आयुक्त अॅक्शन मोडवर : ३८ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

सोलापूर : प्रतिनिधी

पोलीस आयुक्त राजेंद्र माने हे अॅक्शन मोडवर येत सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत असलेल्या ७ पोलीस ठाणे आणि पोलीस चौकांच्या प्रमुखांच्या अंतर्गत बदल्या करून सुस्त पोलीस प्रशासन यंत्रणेला कामाला लावले आहे. यामध्ये २३ सहाय्यक पोलीस निरीक्षक, १३ फौजदार, २ पोलीस निरीक्षक असे ३८ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. नुकताच काही पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांच्या बदल्या करण्यात आल्या. अवैध धंद्यात मोठ्या प्रमाणात झालेली वाढ, मंत्री वा लोकप्रतिनिधी यांच्यासमोर होत असलेली आंदोलने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संभाव्य दौरा, ग्रामदैवत सिध्देश्वर यात्रा या अनुषंगाने ह्या बदल्या करण्यात आले असून पोलीस प्रशासनातील खुर्ची पालट असल्याचे बोलले जात आहे.

झालेल्या बदल्या याप्रमाणे; पोलीस निरीक्षक वैष्णवी पाटील यांची एमआयडीसीत, सदर बझारचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर यांची नियंत्रण कक्षात, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित पाटील जेलरोड व पुनम बागल यांची जेलरोड, दत्तात्रय काळे व रईसा शेख यांची जेलरोड, स्वाती यळे यांची विजापूर नाका, दादासाहेब मोरे यांची नक्षलविरोधी पथक, तुकाराम घाडगे, विद्या सावंत, राहुल नामदे, नितीन पेटकर व रमेश भंडारे यांची शहर वाहतूक, विष्णू गायकवाड व हिना कौसर कलाल यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. यशवंत बारवकर यांच्याकडे ‘कोर्ट पैरवी’ची जबाबदारी देण्यात आली. जीवन निरगुडे दहशतवाद विरोधी पथक, विशाल दांडगे विशेष शाखा, सचिन बंडगर सुरक्षा शाखा, संजय क्षीरसागर अतिक्रमण विरोधी पथक, ज्योती कडू महिला सुरक्षा विशेष कक्ष, तुकाराम लांधी सदर बाजार, मुनीर मुल्ला सलगर वस्ती, दिनेश कुलकर्णी शहर वाहतूक, पोलीस उपनिरीक्षक अविनाश नळेगावकर यांची जेलरोड येथे तर सचिन माळी यांची शहर वाहतूक शाखेकडे बदली करण्यात आली. नंदकिशोर साळुंखे, बाळासाहेब उन्हाळे, अनिल वळसंगे व बालाजी मस्के यांची नियंत्रण कक्ष, चक्रधर ताकभाते, प्रतापसिंह डोंगरे, मुकेश गायकवाड जलद प्रतिसाद पथक, शशिकांत लोंढे, नरसप्पा राठोड व प्रशांत क्षीरसागर यांची दंगा नियंत्रण पथकाकडे तर करोना चौगुले व अश्विनी तळे यांची महिला सुरक्षा विशेष पथकात बदली झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!